Pooja Bhatt Accuses Abhishek Malhan : 'बिग बॉस' हा टेलिव्हिजन रिॲलिटी शो नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसतो. काही दिवसांपूर्वी बिग बॉस ओटीटीचे दुसरं पर्व सुरू झाले आहे. 'बिग बॉस ओटीटी २' या पर्वाने अल्पावधीतच सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमुळे बिग बॉसच्या घरातील पूजा भट्ट चर्चेत आली आहे.
'बिग बॉस ओटीटी २' मध्ये रोज नवीन वाद होताना आपल्याला दिसतात. अशातच वादाची ठिणगी म्हणून पूजा भटने अविनाश आणि अभिषेकला सुनावले आहे. नुकताच बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. या टास्क दरम्यान पूजा मात्र चांगलीच भडकलेली दिसली. शो मध्ये नॉमिनेशन टास्क पाडला. (Latest Entertainment News In Marathi)
टास्कमध्ये सर्वांनीच पूजाला निशाण्यावर धरलं होतं. हा नॉमिनेशन टास्क बिग बॉसच्या घरातील सर्वात अवघड टास्क होता. या टास्कमध्ये कोणालाही शारिरिक त्रास झाला नाही पण मानसिक त्रास मात्र खूप झाला. या टास्कमध्ये दुसऱ्या स्पर्धकाला नॉमिनेट करण्यासाठी त्यांना स्वतः च्या जवळच्या गोष्टींचा त्याग करावा लागला.
या टास्कदरम्यान अविनाश सचदेवने पूजा भट्टला नॉमिनेट केले होते. त्यासाठी तिला स्वतः च्या ब्रेसलेटचा त्याग करावा लागला. या टास्कदरम्यान अविनाशने पूजावर चूकीच्या लोकांना पाठिंबा देते असा आरोप केला होता. अविनाशच्या या आरोपानंतर मात्र पूजाचा पारा चढला. या टास्कमध्ये अभिषेकनेही अविनाशला सपोर्ट केलं. त्यानंतर पूजाने या दोघांनाही चांगलेच सुनावले. पूजाने अभिषेकवर निशाणा साधला.
अभिषेकने बेबिकाच्या शरीरावरुन देखील अश्लील कमेंट करतो असं ती म्हणाली. पूजाला मात्र त्याची ही वागणूक आवडली नाही. यानंतर मात्र घरातील सर्व सदस्य पूजाच्या विरोधात उभे राहिले. पण पूजानेही माघार घेतली नाही. तिने तिचे प्रत्येक मुद्दे स्पर्धकांसमोर मांडले.
या नॉमिनेशन टास्कदरम्यान मात्र घरातील सदस्यांना स्वतः च्या जवळील गोष्टींचा त्याग केल्यामुळे दुःख झाले आहे. या टास्कमध्ये फलक नाझने स्वतः च्या कुटुंबाच्या फोटोचा त्याग केला. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.