Bigg Boss OTT 2 Host Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2 Grand Premier : 'बिग बॉस ओटीटी 2'मध्ये स्पर्धकांची ग्रँड एन्ट्री ; शोमधील १३ व्या स्पर्धकाला पाहून सगळेच थक्क

Bigg Boss OTT 2 Contestant : बिग बॉस ओटीटीच्या घरामध्ये १३ स्पर्धकांची एन्ट्री झाली.

Pooja Dange

Bigg Boss OTT 2 Contestant List : 'बिग बॉस ओटीटी २' च्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. बिग बॉस ओटीटीच्या घरामध्ये १३ स्पर्धकांची एन्ट्री झाली. या १३ स्पर्धकांमध्ये अभिनेते आणि अभिनेत्रींसह काही युट्युबर आणि कॉन्टेट क्रिएटरचा बिग बॉसच्या घरात प्रवेश झाला. चला तर नजर टाकूया बिग बॉसच्या घरातील स्पर्धाकांवर.

बिग बॉस ओटीटीचा ग्रँड प्रिमियर सोहळा आज पार पडला. घरामध्ये स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. यामध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत. अनेक यात अशा दोन नावांचा देखील समावेश झाला आहे ज्याची कोणी कधी कल्पना केली नसेल. (Latest Entertainment News)

बिग बॉसच्या घरामध्ये पहिला प्रवेश केला टीव्ही अभिनेत्री आणि डान्सर फलक नाझची. त्यानंतर प्रवेश झाला वेड चित्रपटामुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या जिया शंकरची. जिया शंकरने बिग बॉस ओतितीच्या ग्रँड प्रिमियरमध्ये सडक चित्रपटातील गाण्यावर डान्स केला. जिया शंकरसोबत घरामध्ये प्रवेश झाला युट्युबर अभिषेक मल्हान म्हणजेच फुकरा इन्सानची. फुकारा इन्सानचे बिग बॉस मंचावर जनतेचं आवाज असलेल्या दिबांग यांच्याशी वाद देखील झाला.

'बिग बॉस ओटीटी 2'च्या घराममध्ये या तिघांनंतर अली बिहारची कॉन्टेट क्रिएटर मनीषा राणी. तसेच तिच्यासोबत आला घरात आला जद हदीद. जद हदीद हा मुळचा लेबनीज असून तो दुबईमधील अभिनेता आहे. पहिल्याच दिवशी मनीषा आणि जद हदीद यांच्यात बॉंडिंग होताना दिसत आहे.

बिग बॉस ओटीटीच्या घरामध्ये एन्ट्री झाली चर्चेत असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीची बायको आलिया सिद्दीकीची. तिच्यासोबत घरात एएन्ट्री झाली डेंटिस्ट, ऍस्ट्रॉलॉजर आणि इंटरनॅशनल अभिनेत्री बेबिका धुर्वेची. तर त्यांच्यासह बिग बॉसमध्ये आला पुनीत सुपरस्टार. त्याने घरात येताच धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.

टीव्ही मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अविनाश सचदेव देखील बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाला आहे. या घरातील दोन सरप्राईज होते ते म्हणजे अभिनेता, लेखक सायरस ब्रोअचाची. तर जनतेच्या आवाज असलेल्यापैकी आणि सलमानसोबत बिग बॉसच्या ग्रँड प्रिमियरची सुरुवात करणारी पूजा भट देखील बिग बॉस ओटीटीमध्ये आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

तर बिग बॉसने दोन स्पर्धकांना होल्डवर ठेवले आहे. यात अविनाश सचदेवची एक्स-गर्लफ्रेंड पलक पुरस्वानी आणि आकांक्षा पुरीचा समावेश आहे. पलकने बिग बॉसच्या घरामध्ये येण्याआधीच बिग बॉसचे नियम तोडले आहेत. तर आकांक्षा पुरीविषयी अजून निर्णय झालेला नाही. या दोघींचा घरात प्रवेश होणार की नाही जे उद्याच्या भागात कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Breakfast Recipe : व्यायामानंतर भरपूर भूक लागते? फक्त ५ मिनिटांत बनवा 'हा' पौष्टिक नाश्ता

Amitabh Bachchan : व्हिडीओ काढणाऱ्या पापाराझींवर अमिताभ बच्चन भडकले, नेमकं घडलं काय?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जुलैचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

Vomiting During Travel: प्रवासात उलट्या होतात का? ‘या’ टिप्स वापरून प्रवास करा बिनधास्त

Maharashtra Live News Update: - नागपूरसह विदर्भात आजपासून पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT