Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: 'कितीदा नव्याने तुला आठवावे', घट्ट मिठी मारताच अभिजीतचे डोळे पाणावले Video पाहा

Bigg Boss Marathi Freeze Release Task: बिग बॉसच्या घरात स्पर्धकांचा आवडता टास्क सुरू आहे. फ्रीझ आणि रिलीज असं या टास्कचं नवा आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीच्या घरात नवीन टास्क पार पडत आहेत. अशातच बिग बॉसमधील स्पर्धक भावूक होताना दिसत आहेत. आतापर्यत बिग बॉसचे आठ आठवडे झाले आहेत. बिग बॉसच्या प्रत्येक आठवड्यात स्पर्धक एलिमिनेट होतात. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात स्पर्धकांचा आवडता टास्क सुरू आहे. फ्रीझ आणि रिलीज असं या टास्कचं नवा आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरात या टास्कचे आयोजन करण्यात आले आहे.

बिग बॉस मराठीमध्ये प्रत्येक सीझनमध्ये फ्रीझ आणि रिलीज हा टास्क असतो. या टास्कमध्ये बिग बॉस फ्रीझ सांगितले की सर्व स्पर्धक जिथे असतील तेथे उभे राहतील आणि हालचाल न करता स्टॅचू पोझमध्ये उभे राहतात. यानंतर बिग बॉस स्पर्धकांच्या घरच्यांना घरामध्ये पाठवतात. नुकतंच बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे.

कलर्स मराठीवर रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये अभिजीत सांवतचं कुटुंब बिग बॉसच्या घरात दिसत आहेत. नुकतंच फ्रीझ आणि रिलीज या टास्कमध्ये अभिजीतची पत्नी बिग बॉसच्या घरात जाताना दिसते. दरम्यान यावेळी पत्नीला पाहून अभिजीत सांवत भावूक झाला. आणि घट्ट मिठी मारली. नंतर अभिजीतच्या दोन्ही मुलीही तेथे आल्या आणि त्यांना पाहून अभिजीतचे डोळे पाणावले. सोशल मीडियावर अभिजीतचा भावनिक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

बिग बॉस मराठी सीझन 5 संपायला आता काही दिवसच उरले आहेत. येत्या ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा अंतिम सोहळा पार पडणार आहे. अशातच बिग बॉसच्या घरात ८ स्पर्धक आहेत. यामुळे बिग बॉस मराठीचा विजेता आता कोण होणार आहे? याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

'मशाली'वर निवडून आले, पण आदेश मोडले; बेपत्ता ४ नगरसेवकांवर ठाकरेंचा निलंबनाचा इशारा

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तर घडणार; ५ राशींच्या लोकांनी घराबाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये, अन्यथा...

अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा सिक्रेट प्लॅन? अमेरिका-इराणमध्ये महायुद्ध पेटणार?

काँग्रेस-MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा, अकोल्यात भाजपचाच महापौर

SCROLL FOR NEXT