बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची पहिली कॅप्टन अंकिता वालावलकर झाली आहे. कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन या टास्कमध्ये योगिताने अंकिताला कॅप्टन म्हणून निवडले आहे.कॅप्टन्सीसाठी दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. मात्र, मोटरमॅनच्या खुर्चीवर बसून योगिताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
बिग बॉसच्या घरात पहिल्या कॅप्टनसाठी जोरदार लढत झाली. यासाठी नवीन टास्क देण्यात आला होता. कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन या टास्कदरम्यान योगिताने सर्वात आधी जाऊन मोटरमनच्या केबिनमधील सीटवर बसली. त्यानंतर तिने घराचा कॅप्टन म्हणून अंकिताला निवडले.
या टास्कमध्ये हिरवी आणि लाल असे दोन मार्ग होते. बिग बॉसच्या आदेशानंतर ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार हे ठरणार होते. त्यानंतर त्या मार्गावर बसलेल्या स्पर्धकांपैकी एक सदस्य कॅप्टन्सीसाठी पात्र ठरणार होता. या टास्कदरम्यान वैभव- सुरज, आर्या आणि जान्हवीमध्ये जोरदार राडा झाला.
टास्कच्या तिसऱ्या फेरीत 'बिग बॉस' हिरव्या रंगाचा मार्ग बंद करतात. फक्त निळ्या रंगाच्या मार्गावर बुलेट ट्रेन धावणआर असते. त्यावेळी हॉर्न वाजल्यावर वैभव आणि योगितामध्ये मोटरमनच्या सीटवर बसण्यावरुन चढाओढ होते. यानंतर योगिता मोटरमनच्या सीटवर बसल्याने तिने अंकिताला कॅप्टन म्हणून निवडले.
योगिता ज्या प्रवाशाला बुलेट ट्रेनमध्ये ठेवणार तो प्रवासी कॅप्टन म्हणून जाहीर होणार असतो. त्यावेळी योगिता अंकिताची निवड करते.बिग बॉसच्या घराला पहिला कॅप्टन मिळाला आहे. यानंतर अंकिताला उचलून गाणं गात कॅप्टनच्या रुममध्ये नेण्यात आले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.