Suraj Chavan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : “...अन् गुलीगत धोका”, सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाचा ट्रेलर पाहून डोळ्यात येईल पाणी

Zapuk Zupuk Trailer Release : ‘बिग बॉस मराठी 5’ चा विजेता सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे.

Shreya Maskar

‘बिग बॉस मराठी 5’ चा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) आता लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्याचा 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk) चित्रपट रिलीजसाठी आता फक्त काही दिवस बाकी आहेत. नुकताच 'झापुक झुपूक' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर (Trailer Release) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या घोषणेपासून चाहते सिनेमा पाहण्यासाठी आतुर होते.

'झापुक झुपूक' चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सूरज चव्हाणने इन्स्टाग्रामवर ट्रेलर पोस्ट करून त्याला हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, “अख्ख्या महाराष्ट्रात झापुक झुपूकचं वेड पसरलय आता गोलीगत सूरज चव्हाण घेऊन येतोय Trailer! जब्बार धमाका करायचा... आख्ख्यांनी ट्रेलरला भरपूर प्रेम आणि like द्यायचं...एकदम गोलीगत…! २५ एप्रिल पासून, ‘झापुक झुपूक’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!“

सूरजच्या नवीन चित्रपटाच्या ट्रेलरवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. 'झापुक झुपूक' चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटातून सूरजच्या आयुष्याचा आजवरचा संघर्ष दाखविण्यात येणार आहे. 'झापुक झुपूक' चित्रपट कॉमेडी, ड्रामा, इमोशनल आणि ॲक्शनने भरपूर आहे. शून्यातून सूरजने सुरू केलेला प्रवास आणि आता मिळत असलेले त्याला प्रेम चित्रपटात पाहता येणार आहे.

'झापुक झुपूक' चित्रपटात सूरजची प्रेम कहाणी पाहायला मिळणार आहे. सूरजचा 'झापुक झुपूक' चित्रपट 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'झापुक झुपूक' चित्रपटात इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत आणि दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंदखेडराजा तालुक्यात तुफानी पाऊस नदी नाल्यांना पूर

लोणावळ्यातील भुशी डॅमवर तरूणाचा किळसवाणा प्रकार; व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप

लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार; CM फडणवीसांनी दिलं मोठं आश्वासन| VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट

Sant Dnyaneshwar Maharaj: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना वारकरी भक्ताकडून चांदीची राखी अर्पण

SCROLL FOR NEXT