Varsha Usgaonkar And Nikki Tamboli Clash Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : पहिल्याच दिवशी 'बिग बॉस'च्या घरात उडाले वादाचे खटके, निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकरांमध्ये कडाक्याचं भांडण

Varsha Usgaonkar And Nikki Tamboli Clash : आजच्या एपिसोडमध्ये सर्व स्पर्धकांना वर्षा उसगांवकरांमुळे जमिनीवर झोपावं लागणार आहे. यामुळे निक्की तांबोळीमध्ये आणि वर्षा उसगांवकरांमध्ये कडाक्याचे भांडण झालं आहे.

Chetan Bodke

बिग बॉस मराठीच्या ५व्या सिजनला सुरुवात झाली आहे. अगदी पहिल्याच दिवशीपासून अनेक कमाल गोष्टी घडत आहेत. घरातील सदस्यांना अडचणीत आलेलं पाहून 'बिग बॉस' प्रेमींना मात्र मजा येत आहे. 'बिग बॉस'ने सदस्यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. सदस्यांचं पाणी बंद केल्यानंतर आणि त्यांना उपाशी ठेवल्यानंतर आता 'बिग बॉस'ने सदस्यांना जमिनीवर आणलं आहे. वर्षा उसगांवकरांमुळे जमिनीवर झोपावं लागणार असल्याने निक्की तांबोळीचा राग अनावर झालेला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या दिवशी काहीही काम नसल्याने वर्षा उसगांवकर झोपल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यासकट घरातील इतर सदस्यांनाही 'बिग बॉस'ने शिक्षा दिलेली आजच्या भागात पाहायला मिळेल. नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत की,"आपल्याला बेडचा वापर करण्याची परवानगी नाही". 'बिग बॉस'च्या या आदेशानंतर घरातील सर्व सदस्य चिंतेत असल्याचे दिसतात.

वर्षा उसगांवकर 'बिग बॉस'ला म्हणाल्या,"चुकून झालं". त्यावर पारा चढलेली निक्की म्हणते,"आम्हाला भोगावं लागतंय..तुमच्यामुळे आता आम्हाला जमिनीवर झोपावं लागतंय". यावर वर्षा म्हणतात,"माझ्या एकटीमुळे नाही". त्यावर निक्की म्हणते,"तुम्ही झोपला होतात तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती". निक्कीला शांत करत वर्षा ताई म्हणतात,"आरडाओरडा करू नको". तरीही निक्की शांत बसत नाही उलट त्यांना प्रतिउत्तर देत त्यांनाच शांत बसण्यास सांगते.

'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांना आता बेडचा वापर करता येणार नाही. निक्की आणि वर्षाताईंचा चढलेला पारा 'बिग बॉस' प्रेमींना मनोरंजनाची मेजवानी देणारा ठरेल. तर 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांना जमिनीवर झोप लागेल का? हे पाहण्यासाठी आजचा रंजक भाग नक्की पाहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT