Nikki Tamboli Bai Bai Funny Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Nikki Tamboli Funny Video : "सगळे हसतात हिच्यापायी, बोलते सारखी बाई बाई"; निक्की तांबोळीमुळे स्पर्धक वैतागले

Nikki Tamboli Funny Viral Video : 'बिग बॉस मराठी'च्या घरात निक्की तांबोळी वारंवार 'बाई बाई' बोलताना दिसून येत आहे. 'बाई बाई' म्हणातानाचा तिचा गोड अंदाज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व दणक्यात सुरू झालं आहे. पहिल्याच दिवसापासून सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे. या वादामध्ये सर्वाधिक चर्चेत बॉलिवूड अभिनेत्री निक्की तांबोळी आहे. निक्की एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री असून ती ‘बिग बॉस १४’ मध्येही होती. आता त्यानंतर निक्की ‘बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या सीझनमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. निक्की मुळची छत्रपती संभाजीनगरची असून ती डोंबिवलीत राहते.

सध्या निक्की तांबोळीच्या मराठीची चाहत्यांमध्ये आणि स्पर्धकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात निक्की तांबोळी वारंवार 'बाई बाई' बोलताना दिसून येत आहे. 'बाई बाई' म्हणातानाचा तिचा गोड अंदाज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. निक्कीचा हा गोड अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तिच्या 'बाई बाई' ह्या डायलॉगवर वर्षा उसगांवकर म्हणतात, "तेवढाच एक मराठी शब्द चांगला येतो हिला."

कलर्स मराठीने हा मजेशीर व्हिडिओ त्यांच्या सोशल मिडिया हँडलवर शेअर केलेला आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून गेल्या काही दिवसांत निक्कीने बिग बॉसच्या घरात जितक्या वेळा 'बाई बाई' हा डायलॉग म्हटला तितक्या वेळचा भाग एडिट करून व्हिडिओ क्रिएट केला आहे. "सगळे हसतात हिच्यापायी, बोलते सारखी बाई बाई..." अशी टॅगलाईन देऊन निक्की तांबोळीचा हा मजेशीर व्हिडिओ व्हायरल केला जात आहे.

निक्की तांबोळी बॉलिवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चित्रपटासोबतच अनेक रिॲलिटी शोमध्येही काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: पुरावे मागितले तर उत्तर आलं नाही; राहुल गांधींकडून संविधानाचा अपमान: निवडणूक आयोग

Maharashtra Politics : खान्देशात काँग्रेसला धक्का! प्रतिभा शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, VIDEO

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

SCROLL FOR NEXT