Aarya Jadho Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 Grand Finale: चुकिला माफी नाही! ग्रँड फिनालेमध्ये आर्या जाधवला नो एन्ट्री? चर्चांना उधाण

Bigg Boss Marathi : आज शेवटच्या दिवशी बिग बॉसच्या घरात रियुनियन टास्क होणार आहे. बिग बॉसच्या घरात सहभागी झालेले सर्व स्पर्धक पुन्हा एकदा फायनलिस्ट स्पर्धकांना भेटणार आहेत.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन 5 संपायला अवघे काही तास बाकी आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या या सीझनचा ग्रँड फिनाले जल्लोषात पार पडणार आहे. ग्रँड फिनालेचं काऊंटडाऊन सुरू झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 6 ऑक्टोबरला या सीझनचा कोण विजेता होणार आणि 'बिग बॉस मराठी'च्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज शेवटच्या दिवशी बिग बॉसच्या घरात रियुनियन टास्क होणार आहे. दरम्यान या टास्कमध्ये बिग बॉसच्या घरात सहभागी झालेले सर्व स्पर्धक पुन्हा एकदा फायनलिस्ट स्पर्धकांना भेटणार आहेत. नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे.

बिग बॉसच्या घरात शेवटच्या दिवशी आज सरप्राईज मिळणार आहे. नुकतीच बिग बॉसने रियुनियनची घोषणा केली. बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांची आज पुन्हा एकदा भेट होणार आहे याच दरम्यानचा व्हिडीओ समोर आला आहे. सर्व स्पर्धक बिग बॉसच्या घरात येताच एकमेकांची भेट घेतात. मात्र यामध्ये आर्या जाधव दिसत नाही यामुळे आर्या आता ग्रँड फिनालेला उपस्थित राहणार की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.

ग्रँड फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेले सदस्य पुन्हा एकदा फायनलिस्ट स्पर्धकांना भेटण्यासाठी येतात. यानुसार उद्या बिग बॉस मराठी ग्रँड फिनाले आहे. यामुळे आतापर्यंत एक्झिट झालेले सर्व स्पर्धक सहभागी होणार आहेत.निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर हे टॉप ६ स्पर्धक बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फानलिस्ट ठरले आहेत. हे स्पर्धक आता अंतिम फेरीपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे आता या ६ जणांपैकी ट्रॉफी कोण उचलणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT