Bigg Boss Marathi 5 Winner  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 Winner : टॉप 3 ठरले; विजेत्याचं नावही आलं समोर, महाराष्ट्राला वेड लावणारा उचलणार ट्रॉफी?

Bigg Boss Marathi Grand Finale : बिग बॉस मराठी 5 लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

Shreya Maskar

अवघ्या १३ दिवसांवर बिग बॉस (Bigg Boss Marathi) मराठीचा ग्रँड फिनाले येऊन ठेपला आहे. सर्वत्र कोण होणार बिग बॉसचा विजेता, कोणाच्या नावावर यंदाचा सीझन हे जाणून घेण्यास प्रेक्षक आतुर झाले आहेत. हा सीझन सुपरहिट ठरला आहे. बिग बॉस मराठी 5 अवघ्या 70 दिवसात प्रेक्षकांची रजा घेणार आहे.

आता बिग बॉस घरातील सर्व सदस्यांना नॉमिनेट करण्यात आले आहे. स्वतःला सुरक्षित करण्यासाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. बिग बॉस हा शो १०० दिवसांचा असतो. मात्र बिग बॉस मराठीचे यंदाचे सीझन लवकर संपत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये थोडी नाराजी पाहायला मिळत आहे. जेव्हा पासून ग्रँड फिनालेची (Grand Finale ) तारीख घोषित करण्यात आली आहे. तेव्हापासून लोकांचे बिग बॉसचा विजेता कोण होणार याकडे लक्ष लागून आहेत. प्रत्येक जण आपल्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देत आहे.

प्रेक्षक टॉप 3 मध्ये सूरज, पॅडी दादा आणि डिपी दादाला पाहतात. तर महाराष्ट्रात जास्तीत जास्त लोकांचे मत सूरज विजेता (Winner ) व्हावा यासाठी आहे. तर काहींना टॉप 3 मध्ये अंकिता हवी आहे. पण कोणाचे ही असे मत नाही की, निक्की टॉप 3 मध्ये यावी. बिग बॉसच्या सुरूवातीपासूनच प्रेक्षकांना सूरज चव्हाण बिग बॉस मराठी 5 जिंकावा असे वाटत आहे. तसेच आताची परिस्थिती पाहता तो जिंकेल असा ठाम विश्वासही पाहायला मिळत आहे. बिग बॉसचा ग्रँड फिनाले 6ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. चाहते आता पासूनच याची वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT