Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: "आपल्या सोबत जे होणार आहे ते आपण बदलू ..." जान्हवीनं दिला सर्वांना कानमंत्र

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन शेवटच्या टप्प्यात आहे. दरम्यान बिग बॉसच्या घरात नेमकं काय सुरू आहे याविषयीच्या चर्चा आहेत.

Manasvi Choudhary

'बिग बॉस' मराठीचे नवे पर्व संपायला थोडेच दिवस राहिले आहेत. आजच्या 'UNSEEN UNDEKHA' मध्ये तुम्ही पाहू शकता, जान्हवी , वर्षा, अभिजीत आणि निक्की गार्डन एरियात बसले असताना, अभिजीत त्यांना एक गोष्ट सांगताना दिसत आहे.

अभिजीत म्हणाला,"आपण सगळे राखी सावंतचे उदाहरण घेऊ शकतो. तिला आयुष्यात कसले गील्ट नाही. जे आयुष्यात झाले ते आता नव्याने उभे राहून पुढचा रस्ता बांधायचा. नव्या दिवशी नवे काय करू शकतो? हे ती बघणार.. परत जाऊन तर ती तो दिवस रिवाइंड नाही करु शकत."

अभिजीत पुढे म्हणाला,"मी एक इंग्लिश चित्रपट बघितला होता. त्यामध्ये एक माणसाचे खूप प्रेम असते एका मुलीवर. तो माणूस वैज्ञानिक‌ असतो. त्याला असे समजते की, त्याच्या गर्लफ्रेंड ˈअक्सिडन्ट् मध्ये मरते. तर तो टाईम मशीन बनवतो आणि मागच्या वेळेत जाऊन तिला तिच्या होणाऱ्या ˈअक्सिडन्ट् विषयी सांगतो. तर ती दुसऱ्या ठिकाणावरून जाते तर वरून काही तरी पडते आणि ती मरते. तो परत मागे जाऊन तिला परत भेटतो आणि सांगतो. हे चक्र चालूच राहते. तो खूप वेळा तिला वाचवतो आणि ती सारखी मरते. यावर जान्हवी म्हणाली," याचा अर्थ आहे की, आपल्या सोबत जे होणार आहे ते आपण बदलू शकत नाही. जे घडणार आहे ते होणारच."

बिग बॉस मराठी सीझन 5 आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. बिग बॉस मराठीचा विजेता ठरण्यासाठी आता काही दिवसच बाकी आहेत. येत्या 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठी सीझन 5 चा ग्रँड फिनाले आहे. अशातच बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यापासून 16 स्पर्धकांपैकी आता 7 स्पर्धक आहेत. या 7 स्पर्धकांमध्ये बिग बॉस मराठी सीझन 5 ची ट्रॉफी कोण जिंकणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT