Bigg Boss Marathi 5  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5: रितेश देशमुखने केले बिग बॉस मराठीचे कौतुक, म्हणाला 'केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगात गाजतोय शो'

Bigg Boss Marathi Grand Finale: 'बिग बॉस मराठी'च्या या सीझनप्रमाणेच रितेश भाऊंनाही महाराष्ट्रासह जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीचा बहुप्रतिक्षित ग्रँड फिनाले रविवारी ६ ऑक्टोबर रोजी आहे. ग्रँड फिनालेचं काऊंटडाऊन सुरू झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 6 ऑक्टोबरला या सीझनचा कोण विजेता होणार आणि 'बिग बॉस मराठी'च्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून मनोरंजनाची नवी पर्वणी मिळाली.

'बिग बॉस मराठी'च्या या सीझनप्रमाणेच रितेश भाऊंनाही महाराष्ट्रासह जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. पाहता पाहता हा महाराष्ट्राचा नंबर वन नॉन फिक्शन शो ठरला. रितेश भाऊंची लयभारी स्टाईल, तरुणांमध्ये त्यांची असलेली क्रेझ ,त्यांची धमालमस्ती, कल्ला आणि सदस्यांमध्ये त्यांचा असलेला आदरयुक्त दरारा या सर्वच गोष्टींमुळे हा सीझन गाजला. रितेश यांच्या 'भाऊच्या धक्क्या'ने टीआरपीचे उच्चांक गाठले. प्रत्येक वीकेंडला सदस्यांची शाळा घेण्यासोबत त्यांची पाठ थोपटण्याचं कामदेखील रितेश भाऊंनी त्यांच्या स्टाईलने केलं. लाडक्या भाऊंनी 'बिग बॉस'प्रेमींवर आपली छाप पाडली. आपल्या स्टाईलने त्यांनी 'बिग बॉस मराठी'ला एक वेगळंच ग्लॅमर आणलं. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते वयोवृद्ध आजी-आजोबांपर्यंत सर्वांनाच या सीझनने अक्षरशः वेड लावलं.

'बिग बॉस मराठी'च्या या सीझनबद्दल बोलताना रितेश देशमुख म्हणाला ,"बिग बॉस मराठी'चा हा सीझन अनेक सरप्राईजेस आणि ट्विस्टने भरलेला होता. प्रत्येक आठवड्यातील भाऊच्या धक्क्याने टीआरपीचे उच्चांक गाठले. छोट्या पडद्यावरचा हा कार्यक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात गाजला. गेले दोन आठवडे व्यस्त चित्रिकरणामुळे मला भाऊच्या धक्क्यावर येता आलं नाही. तुम्ही सर्वांनी माझी आठवण काढलीत, याचा मला अंदाज आहे. पण आता ग्रँड फिनालेला मी या दोन आठवड्याची कसर भरून प्रेक्षकांना मनोरंजनाची तुफान मेजवानी देणार आहे. खूप सरप्रायजेसनी , उत्सुकतेने भरलेला हा ग्रँड फिनाले असेल".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बीडच्या मयत ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या कुटुंबीयांना मिळाला न्याय

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

SCROLL FOR NEXT