Rappper Aarya Jadhav And Vaibhav Chavhan News 
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : आर्या झाली बारामतीच्या रांगड्या गडीवर फिदा, वैभव-इरिनाला एकत्र पाहून ढसाढसा रडली; पाहा VIDEO

Rappper Aarya Jadhav And Vaibhav Chavhan News : वैभव चव्हाणच्या प्रेमाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. आता इरिनानंतर आणखी एका स्पर्धकाच्या प्रेमामुळे तो चर्चेत आला आहे.

Jyoti Shinde

नुकताच सुरू झालेल्या 'बिग बॉस मराठी' च्या पाचव्या पर्वाची जोरदार चर्चा घराघरांत पाहायला मिळते. भांडण, प्रेम, वादविवाद आणि असे अनेक किस्से आपल्याला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळत आहे. अलीकडेच बिग बॉसच्या घरात अरबाज आणि निक्कीमध्ये प्रेमाचे वारे दिसून आले होते. त्यानंतर आता आणखी एका स्पर्धकाच्या प्रेमाची चर्चा सुरू आहे. वैभव चव्हाणच्या प्रेमाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. आता इरिनानंतर आणखी एका स्पर्धकाच्या प्रेमामुळे तो चर्चेत आला आहे.

'बिग बॉस'चा पाचवा सीझन सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत. पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरात प्रेमाचे वारे वाहत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी वैभव चव्हाण आणि इरिना रुडाकोव्हामधील प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता अशातच वैभव चव्हाणचं नाव आणखी एका स्पर्धकासोबत जोडलं जात आहे. ती स्पर्धक दुसरा तिसरा कोणीही नसून रॅपर आर्या जाधव आहे. सध्या सोशल मीडियावर एक प्रोमो तुफान व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दोघांच्याही प्रेमाची चर्चा होताना दिसत आहे.

नुकताच बिग बॉस मराठीच्या आजच्या एपिसोडमधील नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या समोरे आला आहे. या प्रोमोमध्ये,वैभव आणि इरिना डान्स करताना दिसत आहेत. यावेळी वैभव म्हणतो,"कसली क्यूट आहे यार ही". पण दुसरीकडे आर्या मात्र हार्टब्रेक झाल्याने ढसाढसा रडताना दिसत आहे. "मी हे सगळं पाहू शकत नाही" असं आर्या बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांना दिसत आहे. तिला रडताना पाहून वैभव स्वत:हून तिच्याशी बोलायला येतो. तेव्हा वैभव आर्याला विचारतो,"काय विषय आहे नक्की?". त्यावर आर्या म्हणते,"मला तू नॅचरली ॲटरॅक्टिव्ह वाटतो"

यावर वैभव म्हणतो,"मी तर तुला असं कोणतं इंटेंशन दिलेलं नाही". पण आर्या म्हणते,"मला तू अट्रॅक्टिव्ह वाटतो… आणि तुला वाटत नसलं तरी मला तुझं अट्रॅक्शन होऊ शकतं" इरिनानंतर रॅपर आर्या सुद्धा वैभवच्या प्रेमात पडल्याचं दिसत आहे. त्यामुळे आर्याचा हार्टब्रेक होणार की वैभव तिचं प्रेम स्वीकारणार? हे येणारा काळच ठरवेल. ‘बिग बॉस’ने हा प्रोमो ‘कलर्स मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. हा प्रोमो पाहून अनेक युजर्सने आर्याला प्रेमात न पडण्याचा सल्ला दिला आहे. त्यासोबतच तिला खेळाकडे लक्ष करायला सांगितले. त्यासोबतच अनेकांनी आर्याला ट्रोलही केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT