Bigg Boss Marathi Update  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: अमृता धोंगडे संतापली; म्हणाली, 'तुम्ही चुकीच्या लोकांना..'

'बिग बॉस'च्या विष-अमृत या नॉमिनेशन कार्याच्या निकालामुळे सर्वच स्पर्धक नाराज आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi 4 Update: 'बिग बॉस मराठी'चे घर म्हणजे कुस्तीचा आखाडा आहे. इथे फक्त शारीरिक नाही तर भावनिक कुस्ती देखील खेळली जाते. टास्कमध्ये सर्व स्पर्धकांना शारीरिक मेहनत करावी लागते आणि टास्क संपल्यानंतर भावनिक. इथे कोणते नाते कधी संपेल याची खात्री देता येत नाही. वाईल्ड कार्ड एन्ट्री केलेल्या स्नेहलताने नॉमिनेट केलेले स्पर्धक नाराज आहेत. यावरून घरामध्ये बरीच चर्चा रंगली आहे.

काल बिग बॉसने घरातील स्पर्धकांवर विष-अमृत हे नॉमिनेशन कार्य सोपविले होते. विष मिळवलेल्या स्पर्धकाला समोरच्या टीममधील स्पर्धकाला नॉमिनेट करता येणार होते. या टास्कमध्ये अमृता देशमुख, अमृता धोंगडे, प्रसाद जवादे, विकास, त्रिशूल, किरण, समृध्दी यांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले आहे.

अमृता धोंगडे नॉमिनेट झाल्यामुळे नाराज झाली आहे. तसेच तिने तिची नाराजी तेजस्विनीकडे बोलूनही दाखवली आहे. यावर तेजस्विनीने स्पष्टीकरण सुद्धा दिले आहे. आता हे स्पष्टीकरण अमृता धोंगडेला पटले आहे की, नाही हे आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. (Bigg Boss Marathi)

अमृता धोंगडे म्हणाली की, 'मला माहिती आहे माझी लीडरशिप क्वालिटी निगेटिव्ह आहे की पोसिटीव्ह आहे. निगेटिव्ह लोकांना तुम्ही सपोर्ट करता आहे आणि आम्हाला करत नाही.. याची काय गरज आहे तेजा.' यावर तेजस्विनी म्हणते की, आम्ही कुठे सपोर्ट करतोय. तिच्या निकषांवर ती ५ पॉइंटने उजवी ठरली.

तर दुसरीकडे स्नेहलता अपूर्वा आणि अमृता देशमुख देखील यावर चर्चा करताना दिसणार आहेत. स्नेहलताचे म्हणणे आहे की, 'मला चुकीचे निर्णय द्यायचे नाहीत. जेणेकरून त्यामुळे मला नॉमिनेशनला तोंड द्यावे लागेल. सर्वजण मला म्हणतात की मी घाबरत नाही वैगरे ... घाबरण किंवा नाही घाबरण हा प्रश्न नाहीये. मी माझ्या निर्णयाबद्दल साशंक झाले'.

अमृता देशमुख म्हणाली, 'तुला आता जरी वाईट वाटत असेल तरी त्यांच्यासमोर बोलताना ठाम राहा कारण ते हो हो म्हणत आहेत पण ते कधीही हा विषय काढतील...' तर स्नेहलताचे म्हणते, 'निकष चुकला नव्हता ना? फक्त सांगताना माझी वाक्यरचना चुकली आहे'. (Actress)

'बिग बॉस'च्या या नॉमिनेशन कार्याच्या निकालामुळे सर्वच स्पर्धक नाराज आहेत. प्रत्येक टीममध्ये याविषयी चर्चा सुरू आहे. या चर्चांचे काय निकष निघणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण यावरूनच स्पर्धक आपली मते आणि आपला खेळ ठरवणार आहेत. (TV)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: 'सहाव्यांदा दक्षिण पश्चिमची जनता आशीर्वाद देणार..' देवेंद्र फडणवीसांना विश्वास

Camphor Benefits: घरात कापूर पाणी शिंपडल्याने होतात अनेक फायदे!

Aus vs Tasmania: ऐकावं ते नवल! १ धाव अन् ८ फलंदाज तंबूत; ७ फलंदाज तर शून्यावर बाद

Milid Devra News : वरळीत ठाकरे Vs देशपांडे Vs देवरा सामना रंगणार ?

Vastu Shastra : घरात या गोष्टी घडणे म्हणजे सुख, शांती आणि समृद्धीचे संकेत

SCROLL FOR NEXT