Mahesh Manjrekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Season 4: 'चावडी'वर मांजरेकर म्हणतात, 'ज्याने गद्दारी केली असेल त्याला...'

शनिवारी पार पडलेल्या दुसऱ्या चावडीवर महेश मांजरेकरांनी रोहित आणि यशश्रीला चांगलेच खडेबोल सुनावले. शनिवारी झालेल्या चावडीवर सर्वांची चांगली शाळा घेतली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बिग बॉसच्या चौथ्या पर्वाला (Bigg Boss) सुरुवात होऊन १५ दिवस झाले आहेत. पहिल्यांदाच सर्व खेळाडूंमध्ये खडाजंगी रंगताना आपल्याला दिसली. पहिल्याच आठवड्यात झालेल्या नॉमिनेशनमुळे बरेच स्पर्धक फूल ऑन टेन्शनमध्ये दिसत होते. आता सर्वच खेळाडू चांगले आनंदात दिसत आहे. सध्यातरी घरातील वातावरण 'ऑल इज वेल' प्रमाणे दिसत आहे. अनेक मता-मतांतरानंतर घरातील वातावरण आनंदीत खेळीत दिसत आहे. पहिल्या चावडीत महेश मांजरेकरांनी सर्वांचीच शाळा घेतली. तर काहींचे मन भरुन कौतुक केले. (Marathi Entertainment News)

शनिवारी पार पडलेल्या दुसऱ्या चावडीवर महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar) रोहित शिंदे आणि यशश्री मसुरकर यांना चांगलेच खडेबोल सुनावले. शनिवारी झालेल्या चावडीवर सर्वांची चांगली शाळा घेतली आहे. अशातच आज बिग बॉसच्या घरात नवे काय घडणार याची उत्सुकता स्पर्धकांसोबत प्रेक्षकांना लागली आहे. महेश मांजरेकर सर्व खेळाडूंना नवा टास्क देणार आहेत.

शेअर केलेल्या प्रोमोमध्ये महेश मांजरेकरांना खेळाडूंना एक संधी देताना दिसत आहे. त्या संधीत ज्या खेळाडूने गद्दारी केली आहे, त्याला उखळीत टाकून ठेचायचे. त्यामुळे या खेळात कोणकोणाची कशी भडास काढते हे आज संध्याकाळीच समजेल.

मांजरेकरांनी दिलेल्या या संधीचे प्रत्येक जण संधीचे सोने करायचा चान्स बघतात. शेअर केलेला प्रोमो पाहता आज संध्याकाळी चांगलाच राडा होणार हे नक्की. सध्या बिग बॉसच्या घरातील दहावा दिवस सुरु असून इतक्या दिवसांमध्ये सगळ्यांचीच मैत्री चांगली झाली आहे. सर्व स्पर्धक गुण्या गोविंदाने घरात एकत्र नांदत आहेत.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT