Alisha Khedekar
दसऱ्याच्या शुभ दिवशी घरात भांडण, वादविवाद किंवा कटू शब्दांचा वापर टाळावा. यामुळे घरातील सकारात्मक वातावरण टिकून राहते.
दसऱ्याला घराची स्वच्छता करणे शुभ मानले जाते. घरात कचरा साचू देऊ नका आणि पूजेची जागा स्वच्छ ठेवा.
दसऱ्याच्या दिवशी अन्न वाया घालवणे टाळावे. अन्नाचा आदर करणे आणि गरजूंना भोजन देणे शुभ मानले जाते.
काही लोक दसऱ्याला पैशांच्या व्यवहारांबाबत विशेष नियम पाळतात. मात्र, उधार दिल्याने दारिद्र्य येते, याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
सणाच्या दिवशी घरातील वस्तू जपून वापरा. विनाकारण वस्तू तोडणे किंवा घरात गोंधळ घालणे टाळल्यास आनंदी वातावरण राहते.
धार्मिक मान्यतेनुसार घरातील स्वच्छतेच्या साधनांचा आणि पूजेच्या वस्तूंचा आदर करावा. त्या स्वच्छ व योग्य ठिकाणी ठेवाव्यात.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा