Kanagan Ranaut: कंगणा म्हणते, 'लोकल फॉर वोकल', तिच्या संदेशाने सोशल मीडियावर चर्चा

कंगना सध्या तिच्या फॅशन सेन्ससाठी जबरदस्त चर्चेत आहे. तिचा साडी लुक नेहमीच चर्चेत असतो. आज अभिनेत्री आपल्या साडी आणि हॅन्डबॅगच्या किंमतीमुळे चर्चेत आली आहे.
kangana ranaut
kangana ranautSaam tv
Published On

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौत (Bollywood) (Kanagana Ranaut) आपल्या वक्तव्यांमुळे बरीच चर्चेत असते. तिची नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तसेच कंगणाची बॉलिवूड क्वीन म्हणून ओळख असून खास बोलण्याच्या शैलीने सर्वाधिक ओळखली जाते. कंगणा आपला मुद्दा उघडपणे मांडते असल्याने तिची अभिनय क्षेत्रात पंगा क्वीन म्हणून ओळख आहे. कंगणा तिच्या फॅशन सेन्सने सर्वांना प्रभावित करते. तिचा एअरपोर्ट लूक अनेकदा व्हायरल होतो. यावेळी कंगणा कोणत्या वक्तव्यामुळे नाही तर एका साडीमुळे चर्चेत आली आहे.

kangana ranaut
सिनेविश्वात खळबळ! प्रेम प्रकरणातून प्रसिद्ध अभिनेत्रीनं केली आत्महत्या, घटनास्थळी सापडली सुसाईड नोट

कंगणा रणौत विमानतळावर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नुकतेच कंगणा रणौतने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये कंगणा विमानतळावर सहावारी साडी नेसली होती. तसेच ती बऱ्याचदा पारंपारिक पोशाखातही दिसून येते. विमानतळावर ही बरेच कलाकार मंडळी पारंपारिक आणि साध्या लूकमध्ये दिसत आहेत. यादरम्यान तिने अगदी साधी कॉटनची साडी नेसली होती. या साडीच्या किंमतीची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. तत्पूर्वी कंगणाने स्वतः या साडीची किंमत उघड करत सर्वानाच चकित केलं आहे. (Bollywood Actress) (Social Media)

kangana ranaut
Bigg Boss Marathi 4: रोहित आणि यशश्रीमुळे चढला महेश मांजरेकरांच्या पारा

कंगणाचा तो खास व्हिडिओ इन्स्टाग्रामवर सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती फिकट निळ्या रंगाच्या कॉटनच्या साडीत दिसत आहे. या व्हिडिओत कंगणाने आपले केस खुले ठेवले आहेत. व्हिडिओ शेअर करत कंगणाने लिहले की, आपण परिधान केलेल्या साडीची किंमत फक्त 600 रुपये आहे. कंगणाच्या साडीसोबतच तिच्या हॅंडबॅगचीही बरीच चर्चा होत आहे. लेडी डायर ब्रॅंडच्या बॅगेची किंमत भारतात 3.5 लाख इतकी किंमत आहे.

Kangana Ranaut Social Media
Kangana Ranaut Social Media Instagram/ @kanganaranaut

कंगणाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणते, 'मी ही साडी कोलकाता येथून ६०० रुपयांना विकत घेतली आहे. फॅशनही आंतरराष्ट्रीय ब्रँडची गुलाम नाही. अति राष्ट्रवादी व्हा, स्वतःचा प्रचार करा. तुमच्या प्रत्येक कृतीचा देशाला फायदा व्हायला हवा. तुम्ही स्थानिक वस्तू खरेदी करा, त्यामुळे अनेक कुटुंबांना मदत होईल. 'वोकल फॉर लोकल', जय हिंद. तिच्या या उपक्रमाचे सोशल मीडियावर चांगलेच कौतूक होत आहे. या व्हिडिओवर सध्या तरी संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे. सोबतच तिच्या आंतरराष्ट्रीय ब्रॅंडच्या बॅगवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला. कंगणा नुकतंच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना भेटण्यासाठी पोहोचली होती. या भेटीदरम्यानचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Edit By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com