Manasvi Choudhary
धावपळीच्या जीवनशैलीत दिवसभर उभे राहिल्यामुळे किंवा सतत बसून काम केल्यामुळे पाय सुजणे, पायांमध्ये कळा मारणे किंवा तीव्र थकवा जाणवणे या समस्या उद्भवतात.
परंतु यावर प्रभावी उपाय म्हणून रात्री झोपण्यापूर्वी ५ मिनिटे पाय भिंतीवर वर करून झोपण्याचा व्यायाम करा.
रोज 5 मिनिटे व्यायाम केल्याने शरीरात काय बदल होतात ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
दिवसभर रक्ताचा प्रवाह गुरुत्वाकर्षणामुळे पायांकडे असतो. पाय वर करून झोपल्यामुळे रक्तप्रवाह उलट दिशेने होऊन हृदय आणि मेंदूपर्यंत रक्ताचा पुरवठा सुरळीत होतो.
जर तुम्हाला टाच दुखणे, पायांची नसा फुगणे किंवा पायांना सूज येण्याचा त्रास असेल, तर हा उपाय खूप फायदेशीर ठरतो.
ही मुद्रा केल्याने मज्जासंस्थाम शांत होते, ज्यामुळे मनाला आराम मिळतो आणि नैराश्य किंवा मानसिक ताण कमी होतो.
शरीर आणि मन रिलॅक्स झाल्यामुळे इन्सोमनियाची समस्या दूर होते आणि गाढ झोप लागण्यास मदत होते.
पोटावरील ताण कमी होऊन बद्धकोष्ठता आणि पचनाच्या इतर समस्या दूर होण्यास मदत मिळते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.