Bigg Boss Marathi 4: मराठी टेलिव्हिजन वरील सर्वाधिक टीआरपी असलेला कार्यक्रम म्हणजे बिग बॉस. काल बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा शेवट झाला. बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकर झाला असून यावेळी फक्त विजेताच चर्चेत राहिला नसून टॉप ५ मधील प्रत्येक स्पर्धकाची चर्चा झाली. टॉप ५ मध्ये अपुर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, किरण माने आणि राखी सावंत हे स्पर्धक होते. प्रत्येकाने आपल्या विशिष्ट खेळीने स्पर्धकांचे मन जिंकले.
या सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धक म्हणजे किरण माने. किरण नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच किरण माने पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रीय झाला आहे. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टॉप ३ मध्ये स्पर्धक ठरलेल्या किरण मानेने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून किरणने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
आभार मानलेल्या या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, 'तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रेमामुळेच इथवरचा प्रवास शक्य होता. सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार' असे म्हणत त्याने एक फोटोही शेअर केला आहे. त्या फोटोत किरण म्हणतो, 'आज या किरण्याला हरण्याच्या दु:खापेक्षा मायबाप प्रेक्षकांची मनं जिंकल्याचं सुख लय मोठं हाय…! किरण माने' असे म्हणत त्याने आपले चाहत्यांचे आभार मानले आहे. सध्या त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
टॉप ५ मध्ये असलेल्या स्पर्धकांपैकी राखी सावंत पहिल्यांदा घरातून बाहेर पडली होती. ती ग्रँड फिनालेतून ९ लाख रुपये घेत घराबाहेर पडली असून अमृता धोंगडेनेही घरातून एक्झिट घेतली. त्यानंतर घरात उरले होते फक्त ३ स्पर्धक. त्यात अपुर्वा नेमळेकर, अक्षय केळकर आणि किरण माने होते. यानंतर झालेल्या एका नॉमिनेशन कार्यातही किरण माने घरातून बाहेर पडला. नंतर उरले फक्त दोन स्पर्धक अपुर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर.
अक्षय केळकर बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला असून त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये बक्षिस म्हणून मिळाले आहे. आणि सोबतच पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाऊचरही अक्षयला मिळाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.