Nikhil Rajeshirke  Instagram/ @nikhilrajeshirkeofficial
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Season 4: निखिल राजेशिर्केला मांजरेकरांनी दिला घरचा नारळ; खेळात रंगली जबरदस्त चुरस

दोन आठवड्याच्या प्रवासानंतर कोणता सदस्य घराबाहेर जाणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच वाट बघत होते. कोणा एका सदस्याला घराबाहेर पडणे अनिवार्य असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शनिवार आणि रविवारी बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात चावडीचा खेळ रंगला. या खेळात महेश मांजरेकरांनी सर्व स्पर्धकांवर टिकेचे बाण सोडले. या टिकास्त्रांवर खेळाडूंनी प्रत्युत्तर ही केले आहे. दिवसेंदिवस खेळ अधिक रंजक पद्धतीने रंगत आहे. काल झालेल्या चावडीत मांजरेकरांनी काही सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. सर्वांना चांगला धडा शिकवत डोळे उघडले आहेत. अखेर या आठवड्यात पहिले एलिमेशन पूर्ण झाले आहे. (Bigg Boss Marathi Season 4)

चावडीत यशश्री आणि रोहित यांच्यावर महेश मांजरेकरांकडून (Mahesh Manjrekar) टिकेचे बाण सोडण्यात आले आहे. तर गेल्या आठवड्यात ज्या सदस्यांनी गद्दारी केली त्यांना ठेचण्याची संधी घरातील सदस्यांना मिळाली होती (Marathi Actors). ज्यामध्ये यशश्रीने अमृताचे नावं घेतले तर मेघा घाडगे यांनी किरण मानेंचे नाव घेतले असून रोहित शिंदेने अमृता धोंगडेचे नाव घेतले. महेश सरांनी सदस्यांना स्वत:च्या चुका दाखवून दिल्या आणि जे घरामध्ये वा टास्कमध्ये दिसत नाहीत त्यांनादेखील ते कुठे कमी पडत आहेत ते सांगितले.

याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या फॅन्सची चुगली बूथद्वारे तेजस्विनीला अपूर्वाची चुगली तर विकासला समृद्धीची चुगली आली. प्रत्येक सदस्याला वाटत असते की आपण या घरामध्ये शेवट पर्यंत टिकून राहावे पण ते शक्य नसते. दोन आठवड्याच्या प्रवासानंतर कोणता सदस्य घराबाहेर जाणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच वाट बघत होते. कोणा एका सदस्याला घराबाहेर पडणे अनिवार्य असल्याने अमृता धोंगडे, रोहित शिंदे, अमृता देशमुख, रुचिरा जाधव आणि निखिल राजेशिर्के हे डेंजर झोनमध्ये आले. ज्यामध्ये निखिल राजेशिर्के याला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.

गेल्या आठवड्यात बाहेर पडणाऱ्या स्पर्धकांमध्ये किरण मानेचे नाव आघाडीवर होते. पण त्यांनी मागच्या आठवड्यापासून आपल्या खेळात अधिक जोर लावत सेफ झाला. त्यामुळे आता निखिल राजेशिर्के आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारा पहिला स्पर्धक आहे. बिग बॉसच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन ही माहिती देण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात कोणते खेळाडू राहणार ? कोण घराबाहेर जाणार ? कोण होईल कॅप्टन ? कोण नॉमिनेट होणार ? कोण सेफ होणार ? हे जाणून घेण्यासाठी स्पर्धकांसह प्रेक्षकही अधिकच उत्सुक झालेले दिसत आहे.

Edit By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT