Bigg Boss Marathi 4 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: महेश मांजरेकरांनी केले विकास आणि किरणचे कौतुक, तर यशश्रीचे उघडले कान

महेश मांजरेकरांनी विकस आणि किरण माने यांचे कौतुक केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi 4 Episode Update: 'बिग बॉस मराठी 4'मध्ये तुफान राडा पाहायला मिळत आहे. दोन टीममध्ये दुभागले गेलेले हे घर रोज नवीन गोष्टींना तोंड देत असते. 'बिग बॉस'च्या घरामध्ये रोज नवीन राडा होत असतो. आठवडाभर 'बिग बॉसच्या घरामध्ये झालेल्या प्रत्येक कृतीची शाळा आठवड्याच्या शेवटी घेतली जाते. महेश मांजरेकर चावडीवर स्पर्धकांच्या घरातील चांगल्या-वाईट कामाचा आढावा घेतात. काहींचे कौतुक करतात तर काहींचे कान उघडतात.

'बिग बॉस'च्या घररामध्ये या आठवड्यात नवीन सदस्याची एन्ट्री झाली आहे. स्नेहलता वसईकर असे या स्पर्धकांचे नाव आहे. स्नेहलतने 'बिग बॉसच्या घरामध्ये येताच सगळ्यांना ती कशी आहे याची तिने ओळख करून दिली आहे. या आठवड्यामध्ये समृद्धी जाधव पुन्हा कॅप्टन झाली आहे.

आजच्या चावडीवर महेश मांजरेकर काय करणार याची सगळ्यांना उत्सुकता असते. महेश मांजरेकरांनी विकस आणि किरण माने यांचे कौतुक केले आहे. विकास आणि किरण यांनी 'खुल्ला करायचा राडा' या टास्कमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला होता. त्यांचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. तसेच त्याच्या या टास्कमधील परफॉर्मन्समुळे त्यांची टीम विजेती ठरली. (Bigg Boss Marathi)

महेश मांजरेकर यांनी या चावडीवर 'टीम बी'ची चांगलीच शाळा घेतली. त्यांनी खेळाचे नियम न पाळल्याने महेश मांजरेकरांनी त्यांना चांगलेच सुनावले. या कार्यात अपूर्वा संचालक होती आणि तिचेही टीमने ऐकले नाही. महेश मांजरेकर यावर टीमला म्हणाले, "अपूर्वा आमचे कान फुटेपर्यंत ओरडत होती आणि सांगत होती दरवाज्याकडे बघा. तिचेही कोणी ऐकले नाही."

यानंतर महेश मांजरेकरांनी यशश्रीला चांगलेच धारेवर धरले. अपूर्वा जसे बोलली तसे यशश्रीने केले असे महेश मांजरेकर म्हणाले. त्यांनी यशश्रीला ती का जिंकत नाही हे सुद्धा सांगितले.

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या चावडीवर सगळ्यांचा चांगली समज मिळणार आहे. घरातील आणि घराबाहेरून आलेल्या स्पर्धकांना महेश मांजरेकांनी आरसा दाखवला आहे. 'बिग बॉस'च्या घरातील स्पर्धक आता तरी स्वतःची निर्णय घेऊन खेळणार का? या चावडीनंतर तरी स्पर्धकांच्या खेळामध्ये फरक पडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (TV)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avirat Patil: घे भरारी! इंजिनीअर झाला, पण पुण्याच्या FTII मध्ये गेला; जळगावच्या तरुणाच्या पहिल्याच लघुपटाला 'सुवर्ण कमळ'

म्हशीला झालं रानगव्यापासून रेडकू, दिसतंय सुद्धा रानगव्यासारखंच | VIDEO

Poha Chivada: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी घरीच बनवा चटपटीत अन् कुरकुरीत पोहा चिवडा, रेसिपी एकदा वाचाच

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; राज्यातील दुकाने राहणार 24 तास खुली, कोणती दुकाने असतील बंद

Maharashtra Politics : गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत पोसलेली कुत्री; कुणी केली जहरी टीका?

SCROLL FOR NEXT