मुंबई: बिग बॉसच्या चौथ्या सीझनला सुरुवात होऊन नुकते काही दिवसच झाले आहेत. तोच त्या घरात भांडणाचे विस्फोट होत आहेत. रोज बिग बॉस खेळाडूंना नवनवीन टास्क देत असतात. त्यात काही स्पर्धकांची मैत्री चांगली होते तर काही खेळाडूंमध्ये बिनसतं. पहिल्याच दिवसापासून भांडणाचे विस्फोट होताना दिसत आहेत. महेश मांजरेकरांनी स्पर्धकांचे कान टोचल्यानंतर सर्वच खेळाडू व्यवस्थित खेळत आहेत. घरात आपल्यासोबत कोण खेळ खेळतंय?, कोणता खेळाडू आपल्याला मनापासून मदत करतंय? याची प्रचिती सर्वच खेळाडूंना आता येऊ लागली आहे.
सध्या स्पर्धकांसह खेळाडूंना घरात लवकरच गट पडेल असे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे आता घरात खरे ट्विस्ट येताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात सध्या 'गेले उडत' हे साप्ताहिक कार्य सुरु आहे. या कार्यातून बिग बॉसच्या घराला दुसऱ्या आठवड्यातील कॅप्टन पदाचे उमेदवार मिळणार आहे. प्रत्येक कार्यात सदस्यांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे या कार्यातून बिग बॉसच्या घरात कॅप्टनरूपी कोणता नवा चेहरा मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
प्रत्येक कार्याप्रमाणे या ही कार्यात बिग बॉसच्या घरात शाब्दिक बाचा-बाची होताना दिसत आहे. काही सदस्यांमध्ये समजूतदारपणा दिसून येत असून काही स्पर्धकांकडून इतका कार्यात समजूतदारपणा दिसत नाही. स्पर्धकांच्या वागणुकीची चर्चा या भागात रंगताना दिसत आहे. यावेळी अक्षय म्हणतो, "आपण समृद्धीचं कौतुक करूया कारण तिने सगळ्यात पहिले निर्णय घेतला की, मी कॅप्टन झाले मी बाहेर जाते. यावर अपूर्वा यशश्रीला बोलते, "जे काही कार्यात होते ते तिथेच सोडायचे. कुठलं पण काहीपण असूदे...''
तर दुसरीकडे प्रसाद त्याच्या टीमला बोलतो, "त्यांच्याकडे.. युनिटी अजिबात नाहीये...'' तर रुचिरा तिकडे टीमला सांगताना दिसते की " युनिटी असणं खूप गरजेच आहे, ती आहेच आणि ती असणारच पण आपण सगळेजण एका पेजवर असणे गरजेचे आहे,'' त्यामुळे या आठवड्यातील कॅप्टन्सीपद कोणत्या टीमकडे जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या तरी प्रत्येक टीमसाठी महत्वाचा मुद्दा हा कॅप्टन्सीचा आहे. टीममधील कोणते सदस्य गाजणार हा येणारा आठवडा सांगेल.
Edit By: Chetan Bodke
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.