Bigg Boss Marathi New Promo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: रितेश देशमुखसोबत आज पुन्हा होणार भाऊचा धक्का, कोणाचे कान टोचणार, कोणाचं होणार कौतुक?

Bigg Boss New Promo Out: भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख संपूर्ण आठवड्यात काय झालंय, कोणी कोणाला नॉमिनेट केलं. कोणाची बत्ती गुल झालीये, याबबत चर्चा करणार आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या सीझनचा सध्या चौथा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात बिग बाॅसच्या घरात कल्ला आणि राडा पाहायला मिळत आहे. अशातच यंदा बिग बाॅसने टीआरपीचे सर्व रेकाॅर्ड मोडत नवा विक्रम केला आहे.

बिग बाॅसचा चौथ्या आठवड्यात बिग बाॅसच्या घरात A आणि B दोन टीम पडल्या. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात दोन्ही टीममध्ये जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. स्पर्धकांमध्ये नाॅमिनेशन टास्क पार पडलं. यामध्ये चार सदस्य नॉमिनेट झाले. आर्या, इरिना, अभिजीत आणि वैभव हे स्पर्धक नॉमिनेट झाले. नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख संपूर्ण आठवड्यात काय झालंय, कोणी कोणाला नॉमिनेट केलं. कोणाची बत्ती गुल झालीये याबबत चर्चा करणार आहे. तसेच बिग बॉसमध्ये जे काही घडलं त्यामध्ये कोणाची चूक होती, कोण बरोबर होतं यावरून रितेश देशमुख सर्वांचीच कानउघडणी करणार आहे.

बिग बॉस मराठीचा चौथा आठवडा फार रंजक होता. या आठवड्यात स्पर्धकांसमोर अनेक टास्क देण्यात आले होते. बिग बॉसच्या निर्णयानुसार दोन्ही टीममधील स्पर्धकांना कॅप्टनपद किंवा बीबी करन्सी असा पर्याय निवडायचा होता.

दोन्ही टीमने विरुद्ध संघातील सदस्यांना बीबी करन्सी जिंकू दिली नाही. यामुळे बिग बॉसने टीम A मधील अरबाजला डिलेमा रूममध्ये बोलावलं आणि पर्याय निवडण्यासाठी सांगितलं. अरबाजने कॅप्टन्सीवर पाणी सोडत घरातल्या सदस्यांचा विचार करून बीबी करन्सीची निवड केली. तर, त्याच्या जागी घराचा कॅप्टन निक्कीला बनवण्यात आलं.

तसेच बाकीच्या सदस्यांमध्ये नॉमिनेशन टास्क झालं. प्रत्येकाच्या गळ्यात एकमेकांचे फोटो देण्यात आले. ज्यांना फोटोतील सदस्यांना नॉमिनेट करायचं असेल त्यांनी पळत जाऊन बझर वाजवायचा. जो आधी बझर वाजवेल त्या सदस्याला नॉमिनेट करण्यासाठी संबंधित सदस्याचा फोटो चुलीत टाकायचा असा टास्क पार पडला. यामुळेच आता नव्या प्रोमोमध्ये भाऊच्या धक्क्यावर संपूर्ण आठवड्यात काय घडलंय? कोणाची बत्ती गुल झालीये? यावर रितेश देशमुख चर्चा करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT