Marathi New Serial SAAM TV
मनोरंजन बातम्या

Marathi New Serial : 'बिग बॉस मराठी' च्या मैत्रिणी मोठ्या पडद्यावर, दिसणार ही अभिनेत्री खलनायिकेच्या भूमिकेत

Megha Dhade : बिग बॉस मराठी फेम मेघा धाडे आता नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत.

Shreya Maskar

बिग बॉसमधून (Bigg Boss Marathi ) प्रेक्षकांचे मन जिंकल्यानंतर आता मेघा धाडे नवीन मालिकेतून प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज आहे. आता झी मराठीवर 'सावळ्याची जणू सावली' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आल आहे. या मालिकेत बिग बॉस फेम मेघा धाडे सोबतच वीणा जगताप देखील दिसणार आहे.

बिग बॉसफेम मेघा धाडे आणि वीणा जगताप एकत्र मालिकेत काम करणार आहे. 'सावळ्याची जणू सावली' (Savlyachi Janu Savali) प्रोमोमध्ये तुम्हाला एक मुलगी स्टेजवर गाताना दिसत आहे मात्र आवाज मालिकेच्या नायिकेचा आहे आणि त्या आवाजाच्या प्रेमात मालिकेचा नायक पडला आहे. प्रोमोमध्ये मेघाची खास एन्ट्री होताना दिसत आहे. मेघा नायिकेला म्हणते की, "तुला काय वाटतं हा टाळ्यांचा कडकडाट तुझ्यासाठी आहे? तुझा आवाज माझ्या मुलीसाठी माझ्याकडे गहाण ठेवलाय."या प्रोमोमध्ये मेघाच्या भन्नाट अभिनयाची झलक पाहायला मिळत आहे.

मेघा धाडे ही 'बिग बॉस मराठी' च्या पहिल्या पर्वाची विजेता होती. तर वीणा जगताप दुसऱ्या पर्वातील स्पर्धक होती. या दोघांचाही खेळ प्रेक्षकांना खूप आवडला होता. मेघा (Megha Dhade) आणि वीणा (Veena Jagta) पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. अभिनेत्री मेघा धाडे या मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मोठ्या ब्रेकनंतर मेघा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच या मालिकेत अनेक तगडे कलाकार आहेत. 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत तुम्हाला सावली नावाच्या मुलीची काहाणी पाहायला मिळणार आहे. तिचे संगीताबद्दलचे प्रेम यातून दाखवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

SCROLL FOR NEXT