Sara-Kartik : कार्तिक आर्यनने एक्स गर्लफ्रेंड साराला दिली जादू की झप्पी!

Call Me Bae Screening : अनन्या पांडेच्या 'कॉल मी बे' च्या स्क्रीनिंगला बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली. यात कार्तिक आर्यन आणि सारा अली खान एकत्र स्पॉट झाले.
Call Me Bae Screening
Sara-KartikSAAM TV
Published On

बॉलिवूड स्टार अनन्या पांडेच्या 'कॉल मी बे' (Call Me Bae) च्या स्क्रीनिंग नुकतीच पार पडली. अनेक सुपरस्टार या कार्यक्रमाला हजर होते. तिची ही कॉमेडी सिरीज ६ सप्टेंबरला प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. सिरीज प्रदर्शित होण्याआधी निर्मात्यांनी मालिकेचे स्क्रीनिंग मुंबईत आयोजित केले होते. या सिरीजमध्ये दिल्लीतील एका श्रीमंत कुटुंबातील मुलीची कथा पाहायला मिळणार आहे.

'कॉल मी बे' सिरीजच्या स्क्रीनिंगमध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) , सारा अली खान, करण जोहर, सुहाना खान, इब्राहिम अली आणि अगस्त्य नंदा याच्यांसह अनेक सेलिब्रिटींनी मुंबईत उपस्थिती लावली होती. हा स्क्रीनिंग शो बुधवारी संध्याकाळी पार पडला. सोशल मिडियावर या स्क्रीनिंगचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात कार्तिक आणि साराचा खास व्हिडिओ पाहायला मिळत आहे. जो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अनन्या पांडेच्या (Ananya Pandey) या स्पेशल स्क्रीनिंगसाठी बॉलिवूडचे अनेक मंडळी आले होते. यात सारा अली खान भाऊ इब्राहिमसोबत आली होती. साराने ( Sara Ali Khan) भावासोबत रेड कार्पेटवर पोज दिली. स्क्रीनिंगला कार्तिक आर्यन देखील आला होता. तेव्हा कार्तिक, सारा आणि इब्राहिममध्ये छान संवाद घडताना दिसला. स्क्रीनिंग संपल्यावर कार्तिक साराला मिठी मारताना स्पॉट झाला. साराही कार्तिकची एक्स गर्लफ्रेंड होती.

'कॉल मी बे' या सिरीजच्या स्क्रीनिंगसाठी साराने परिधान केला होता. शॉट हेअर आणि मिनिमल मेकअपमध्ये सारा खूप क्यूट दिसत होती. तसेच कार्तिक ग्रे स्वेटशर्ट आणि ब्लू जीन्समध्ये स्पॉट झाला. कार्तिक- साराचा हा मिठी मारण्याचा व्हिडिओ पॅप्सने कॅप्चर केला आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. या व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत आहेत. हा व्हिडिओ पाहून काहींना तर प्रश्न पडला आहे की, कार्तिक- सारा पुन्हा एकत्र येणार आहेत का? आता सारा आणि कार्तिक जरी एकमेकांना डेट करत नसले तरी त्यांची मैत्री सर्वांसाठी खूप खास आहे.

Call Me Bae Screening
Dolly Chaiwala Income : नागपुरच्या डॉली चायवाल्याची परदेशात हवा, कमाई ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com