Ilu Ilu Movie PR
मनोरंजन बातम्या

Ilu Ilu Movie: बिग बॉस फेम अभिनेत्री लवकरच नव्या सिनेमात झळकणार, या अभिनेत्यासोबत रंगणार धमाल लव्ह ट्रॅक

Ilu Ilu Movie : इलू इलू या आगामी मराठी चित्रपटात बिग बॉस मराठी फेम मीरा जगन्नाथ यांची अभिनेते श्रीकांत यादव यांच्या सोबत रोमँटिक केमेस्ट्री पहायला मिळणार आहे.

Shruti Vilas Kadam

Ilu Ilu Movie : दर्जेदार आणि संवेदनशील अभिनयाच्या जोरावर श्रीकांत यादव यांनी मनोरंजनसृष्टीत खास ओळख निर्माण केली हिंदी-मराठी चित्रपटातील त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या नजरेत भरल्या आहेत. या गुणी अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज आगामी ‘इलू इलू’ या चित्रपटात दिसणार आहे. ग्लॅमरस अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिच्या सोबत त्यांचा धमाल लव्ह ट्रॅक पाहायला मिळणार आहे. या दोघांची एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चित्रपटात त्यांचा रोमँटिक ट्रॅक असून या दोघांचं प्रेम कसं खुलतं? याची धमाल बघणं प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे.

अभिनेते श्रीकांत यादव सांगतात, 'मिलिंद सुर्वे ही व्यक्तिरेखा मी यात साकारली आहे. आपलं पहिलं प्रेम अचानक समोर आल्यावर माझी अवस्था काय होणार? याची धमाल या चित्रपटात पहाता येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मी आणि मीरा आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम केलं असलं तरी एकमेकांसोबत उत्तम टयुनिंग असल्यामुळे आमच्या या भूमिका आम्ही खूप एन्जॉय केल्याचं हे दोघे सांगतात.

या दोघांसोबत बॉलिवूड गाजवलेली प्रसिद्ध अभिनेत्री एली आवराम, वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात, निशांत भावसार, कमलाकर सातपुते, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात आहेत.

इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ हा मराठी चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT