Preity Zinta: लॉस एंजेलिसमधील अग्नीतांडवात प्रीती झिंटा अडकलीये! विंध्वसाची परिस्थिती सांगणारी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

Preity Zinta: बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा लग्नापासून तिच्या पतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहत आहे. एलए येथे लागलेल्या भीषणा आगीला पाहून प्रीती झिंटा खूप घाबरली असून तिने पोस्टद्वारे तिथल्या परिस्थितीबद्दल सांगितले आहे.
Preity Zinta
Preity ZintaGoogle
Published On

Preity Zinta: ९० च्या दशकातील सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. प्रीती झिंटा लग्नापासून लॉस एंजेलिसमध्ये राहत आहे. जरी ती वारंवार भारतात येत असली तरी, २०१६ मध्ये तिच्या लग्नानंतर ती पूर्णपणे तिथेच स्थलांतरित झाली आहे. प्रीती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि चाहत्यांसोबत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. दरम्यान, प्रीती झिंटाने तिची भीती तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. लॉस एंजेलिसमधील भीषण आगीमुळे सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील आग थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या भीषण आगीमुळे अनेक लोक बेघर झाले आहेत. लोकांची घरे जळून राख झाली आहेत. या आगीत अनेक मोठ्या स्टार्सच्या घरांनाही फटका बसला आहे. सध्या लॉस एंजेलिसमध्ये सर्वत्र विनाश आहे. यावेळी अनेक लोक ही आग विझण्यासाठी प्रार्थना करत आहेत. लॉस एंजेलिसमध्ये अनेक मोठे बॉलीवूड स्टार राहतात, जे ही धगधगणारी आग पाहून घाबरले आहेत. प्रीती झिंटाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने तिथल्या दृश्याचे वर्णन केले आहे.

Preity Zinta
Akaay Kohli First Look: जेह आणि राहाला विसरण्यास भाग पाडेल अकायचं गोंडस रूप, पहिली झलक समोर, पाहा व्हिडीओ

प्रीती झिंटाने पोस्ट शेअर करून तिची भीती व्यक्त केली

प्रीती झिंटाने तिच्या पोस्टद्वारे सर्वांना सांगितले आहे की ती शहरातील आगीपासून सुरक्षित आहे. या कठीण काळात तिथे उपस्थित असलेल्या लोकांचे दुःख तिने व्यक्त केले आहे. प्रीती झिंटाने X वर लिहिले, “मी कधीच कल्पना केली नव्हती की असा दिवस येईल जेव्हा आगीमुळे आमचा परिसर उद्ध्वस्त होईल. आमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना बाहेर काढले जाईल किंवा त्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात येईल. इथे वारा आला तर काय होईल याची भीती असेल. आजूबाजूला झालेल्या या विध्वंसामुळे मी दुःखी आहे आणि आपण अजूनही सुरक्षित आहोत याबद्दल देवाचे आभार मानते.

Preity Zinta
Manisha Koirala On Relationship: मनीषा कोईराला ५४ व्या वर्षात कोणाला करतेय डेट?

तिच्या पोस्टच्या शेवटी, प्रीती झिंटाने प्रार्थना केली आहे की वारा लवकरच शांत होईल आणि आगही आटोक्यात येईल. या कठीण काळात लोकांना मदत करणाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले आहेत. प्रीती झिंटा व्यतिरिक्त, प्रियांका चोप्रा देखील लॉस एंजेलिसमध्ये राहते आणि तिने या आगीबद्दलची तिची चिंता व्यक्त केली आहे. अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये तिच्या घराजवळील जंगलातील आग स्पष्टपणे दिसत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com