Chota Pudhari Haldi Ceremony Video Saam tv
मनोरंजन बातम्या

Chota Pudhari Haldi Ceremony Video: सूरज चव्हाणनंतर छोटा पुढारी अडकणार लग्न बंधनात? हळदीचा व्हिडीओ व्हायरल

Chota Pudhari Haldi Ceremony: ‘बिग बॉस मराठी ५’ मधील छोटा पुढारी म्हणून ओळखला जाणारा घनश्याम दरोडे याने त्याच्या हळदी समारंभाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

Shruti Vilas Kadam

Chota Pudhari Haldi Ceremony: ‘बिग बॉस मराठी ५’मधून ओळखला जाणारा छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे याने त्याच्या हळदी समारंभाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, त्यामुळे आता सुरज चव्हाणनंतर तो पण लग्न करणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

व्हिडीओमध्ये पारंपरिक हळदी विधी सुरु असताना घनश्याम घरातील कपड्यांमध्ये दिसतोय त्याची आईने त्याला हळदी लावत दिसत आहे. त्याने त्याच्या या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे, “नवरदेव झालो ना राव… हळद लागली एकदाची… माझं पण ठरलं बरका… यायला लागतंय”. या कॅप्शनमुळे अनेकांनी असा अंदाज बांधला आहे की त्याचे लग्न लवकरच होणार आहे.

या व्हिडीओला चाहत्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या मात्र काहींनी त्याच्या वयानुसार हे थोडं लवकर असल्याचं सांगत टीका केली. काहींनी कमेंटमध्ये “बालविवाह करु नये” सारखी टीका देखील केली आहे.

मात्र, आधी झालेल्या चर्चांमध्ये घनश्यामने स्वत: स्पष्ट केलं होतं की, काही अफवा पसरल्या होत्या. ज्यात त्याच्या निधनाची देखील चर्चा होती; त्यावेळी त्याने एक व्हिडीओद्वारे ते खोटं असल्याचं सांगितलं आणि सर्वांना सांगितलं “मी ठिक आहे, माझं काही झालेलं नाही”. यासह या व्हिडीओच्या शेवटी कळते की तो त्याच्या हळदीचे आणि लग्नाच्या खरेदीचे फक्त स्वप्न बघतं होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT