Sonali Patil  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sonali Patil : 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीनं बनवल्या पुरणपोळ्या, पाहा VIDEO

Sonali Patil Made Puran Poli : सोनाली पाटीलने खमंग आणि खुसखुशीत पुरणपोळ्या बनवल्या आहेत. याचा एक खास व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस'मुळे अनेकांना लोकप्रियता मिळते. 'बिग बॉस'चे स्पर्धक कायम त्यांच्या आयुष्यामुळे चर्चेत राहतात. ते लोक आपल्या आयुष्यातील अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवतात. अशीच एक स्पर्धक म्हणजे सोनाली पाटील होय. सोनालीला 'बिग बॉस मराठी'मुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. ती कायमच सोशल मिडिया सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील अपडेट ती कायम चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सोनालीने पाटील सोशल मिडिया एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ती पुरणपोळी बनवताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये सोनाली स्वतःच्या हाताने पुरणपोळ्या बनवत आहे. सोनाली गावाकडे घरी पुरणपोळी बनवत आहे. तिने या पोस्टला खूप हटके कॅप्शन दिले आहे. सोनालीने लिहिलं की, "आत्मलिंग जत्रा...मामाचं गाव...पुरणपोळी...सासनकाठी नैवेद्य" सध्या सोनालीच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सोनाली पाटील आत्मलिंग जत्रेसाठी तिच्या मामाच्या गावाला गेली आहे. तिथून तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोनाली ही एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने मालिकांमध्य काम देखील केले आहे. बिग बॉसमधील तिचा खेळ चाहत्यांना खूप आवडला आहे. सोनाली पाटील पेशाने शिक्षिका आहे. बिग बॉसच्या घरातील सोनाली बिग बॉसचा साधाभोळा स्वभाव चाहत्यांना खूप आवडतो.

अलिकडेच अभिनेत्री तिची मैत्रीण मीनल शाहच्या लग्न समारंभाला स्पॉट झाली होती. सोनाली पाटील कायम आपल्या हटके लूकचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. चाहते तिच्या मराठमोळ्या लूकवर कायमच फिदा होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान

Plane Crash News : भयंकर! उड्डाण घेताच काही सेकंदात विमान कोसळलं, ५ विद्यार्थ्यांसह ११ जणांचा मृत्यू

Early kidney cancer: शरीरात दिसणारे हे ५ बदल सामान्य समजताय? किडनी कॅन्सरची सुरुवातीची धोकादायक चिन्हं असू शकतात

Crime: संभाजीनगर हादरले! रॅप साँग गाण्यावरून कडाक्याचे भांडण, १० जणांनी धारदार शस्त्राने वार करत तरुणाला संपवलं

Rain Alert : पावसानं जोर पकडला, पुढचे २४ तास महत्वाचे; मुंबई- पुण्यासह ३० जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT