Big Boss Marathi:  मोलनो
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi: आर्याने निक्कीला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ दाखवा; अभिनेत्री सुरेखानं बिग बॉसकडे केली मागणी

Big Boss Marathi Surekha Kudachi Post: बिग बॉसच्या घरातील कॅप्टनसी टास्क दरम्यान आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. यामुळे बिग बॉसकडून आर्याला शिक्षा देण्यात आली आहे. अभिनेत्री सुरेखा कुडचीने तिच्या सोशल मीडियवर एक पोस्ट करत आर्याला सपोर्ट केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिग बॉस मराठीच्या ५वा सिझन सध्या रंजक वळणावर आला आहे. नुकताच झालेल्या कॅप्टनसी टास्कमध्ये आर्या जाधव निक्की तांबोळीच्या कानाखाली मारते. यामुळे बिग बॉसच्या घरातील कॅप्टनसी टास्क रद्द करण्यात आला. यामुळे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले आहेत. आर्या जाधवच्या सपोर्टला अनेक बिग बॉस मराठीचे प्रेक्षक उभे राहिले आहेत. परंतु बिग बॉसकडून आर्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. आर्याला जेलची शिक्षा देण्यात आली आहे.

दरम्यान अनेक कलाकार देखील आर्याचा सपोर्ट करत आहेत. अभिनेत्री सुरेखा कुडचीने तिच्या सोशल मीडियवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये तिनं एक प्रश्न विचारला आहे. अभिनेत्री सुरेखा कुडची बिग बॉसचे प्रत्येक एपिसोड पाहुन त्याबद्दल लिहीत असतात.

काल झालेल्या एपिसोडनंतर सुरेखाने लिहीले की, "कॅप्टनसी टास्क दरम्यान आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली असं सर्वे म्हणत आहेत. परंतु, प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये असं कुठेच क्लिअर दिसत नाहीये. अरबाज डायरेक्ट बोलत सुटला आर्याने थप्पड मारा म्हणून. आणि मग काय निक्कीने तर डायरेक्ट गार्डन एरियामध्ये येऊन ड्रामा सुरु केला. परंतु, आर्याने निक्कीला मारलं असं कुठेही दिसलं नाही आहे. त्यानंतर त्यांनी विचारलं की, आर्याला एलिमिनेट करणं तुम्हाला योग्य वाटतं की अयोग्य?"

प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश आर्याला बिग बॉसकडे सोपवणार आहे. त्यामुळे बिग बॉस आर्याच्या या चुकीमुळे तिला थेट एलिमिनेट करमार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. बिग बॉसच्या घरामधील अरबाज आणि निक्की विरुद्ध वातावरण टाईट आह. घरीतील टीम बी आर्यातची साथ देताना दिसत आहेत. मात्र आर्याने निक्कीच्या कानाखाली मारून चुक करून बसली आहे. या आठवड्यात अरबाज, निक्की, आर्या, अंकिता, धनंजय आणि वैभव हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. या सदस्यांमधील बिग बॉसच्या घराबाहेर कोण जाणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.

Edited By: Nirmiti Rasal.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT