Bigg Boss Marathi 6 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी ६' ची चमकदार महाट्रॉफी पाहिली का? पहिली झलक आली समोर | VIDEO

Bigg Boss Marathi 6 Winner Trophy First Look : रितेश भाऊंच्या 'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड फिनाले काही तासांवर येऊन ठेपला आहे. 'बिग बॉस मराठी ६'च्या ट्रॉफीची पहिली झलक समोर आली आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड फिनाले आज (19 एप्रिल) ला होणार आहे.

'बिग बॉस मराठी ६' च्या विजेत्याला महाट्रॉफीसोबत लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

'बिग बॉस मराठी ६' ची महाट्रॉफीची झलक समोर आली आहे.

'बिग बॉस मराठी ६' चा तीन महिन्यांचा प्रवास अखेर आज (19 एप्रिल 2026) संपणार आहे. गेले १०० दिवस टॉप ५ स्पर्धकांनी घरात राडा घातला. बिग बॉसच्या घरात मैत्री, प्रेम आणि शत्रू या सर्व भावना पाहायला मिळाल्या. रितेश भाऊंनी वेळोवेळी घरातील सदस्यांची शाळा घेतली तसेच कौतुक देखील केले. अखेर ग्रँड फिनालेचा दिवस आला आहे. 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी कोण उचलणार याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागली आहे. 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी समोर आली आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात शेवटच्या दिवसांमध्ये बिग बॉस मराठीच्या १,२,३,४,५ सीझनचे विजेते आले. यात मेघा धाडे, शिव ठाकरे , विशाल निकम, अक्षय केळकर, सूरज चव्हाण यांच्या समावेश होता. तसेच बिग बॉसचे ५ सीझनमधील लोकप्रिय स्पर्धक अंकिता वालावलकर, अभिजित सावंत, गायक उत्कर्ष शिंदे आणि पुष्कर जोगही आले. यांनी घरातील सदस्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचे कौतुक केले. तसेच त्यांच्यासोबत गेम खेळले.

'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी

'बिग बॉस मराठी ६'च्या महाट्रॉफीची पहिली झलक समोर आली आहे. सोनेरी रंगांच्या या चमकादर ट्रॉफीने स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ट्रॉफी 'Bigg Boss मराठी Winner Season 6' असे लिहिलं आहे. सुंदर ट्रॉफी पाहून घरातील सदस्य भावुक झाले.

विजेत्याला बक्षीस काय?

मीडिया रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस मराठी ६’ च्या विजेत्याला चमकदार ट्रॉफीसोबत तब्बल 15 लाख रुपयांची प्राइज मनी मिळणार आहे.‘टास्क क्वीन’ तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी जिंकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. विजेत्याचे नाव रितेश भाऊच ग्रँड फिनालेला घोषित करतील.

टॉप-५ फायनलिस्ट कोण?

  • तन्वी कोलते

  • राकेश बापट

  • अनुश्री माने

  • विशाल कोटियन

  • दिपाली सय्यद

ग्रँड फिनाले कुठे अन् कधी पाहता येणार?

‘बिग बॉस मराठी ६’ ग्रँड फिनाले 19 एप्रिल 2026 ला म्हणजेच येणाऱ्या रविवारी (अक्षय तृतीया) पार पडणार आहे. ग्रँड फिनाले रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oral Medicines: सरकारचा नवा नियम; आता मेडिकलमधून कोणालाही मिळणार नाहीत ही औषधं, जाणून घ्या कारण

Sairat 2: 'सैराट २' येणार का? नागराज मंजुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले, 'चांगली कथा असेल तरच...'

ITR Update : वेळेत आयटीआर भरला तरीही रिफंड अडकू शकतो; एका चुकीमुळे भरावा लागेल दंड

Maharashtra Politics: मोठी राजकीय घडामोड! शिंदे ठाकरेंना पुन्हा धक्का देणार, १२ नगरसेवक गळाला

म्हातारपणात मुलांनी सांभाळलं नाही, तर आई-वडील आपली मालमत्ता परत घेऊ शकतात: मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT