Bigg Boss Marathi 6 Winner  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 Winner : मराठीनंतर तन्वी कोलते हिंदी बिग बॉस गाजवणार? स्वतः केला मोठा खुलासा

Tanvi Kolte On Entry In Hindi Bigg Boss: 'बिग बॉस मराठी ६' जिंकलेली तन्वी कोलतेने आता हिंदी बिग बॉसच्या एन्ट्री विषयी मोठे वक्तव्य केले आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी ६'ची विजेता तन्वी कोलते झाली.

तन्वी कोलतेने हिंदी बिग बॉसच्या एन्ट्रीवर आपली प्रतिक्रिया दिली.

तन्वी 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात 'टास्क क्वीन' ठरली.

रितेश भाऊ होस्ट करत असलेला 'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड फिनाले १९ एप्रिलला थाटामाटात पार पडला आहे. तन्वी कोलतेने 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी उचलली आहे. सध्या सर्वत्र तन्वी कोलतेची चर्चा पाहायला मिळत आहे. तन्वी कोलते मूळची कोकणची आहे. बिग बॉसच्या सुरूवातीपासून तन्वी कोलतेचे नाव विजेतेपदासाठी चर्चेत होते. तन्वी कोलते 'बिग बॉसची क्वीन' आणि 'टास्क क्वीन' ठरली.

नुकत्याच एका मिडिया मुलाखतीत तन्वी कोलतेने आपल्या 'बिग बॉस हिंदी'च्या एन्ट्रीबद्दल वक्तव्य केले. ती नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात. 'नवशक्ती'ला दिलेल्या मुलाखतीत तन्वी कोलतेला विचारण्यात आले की, "मराठी बिग बॉसनंतर आता तू हिंदी बिग बॉसमध्ये जाणार का?" त्यावर उत्तर देत तन्वी कोलते म्हणाली की, "नक्कीच! ऑफर आली तर मी नक्की जाईन. तिथे सुद्धा मी माझे १०० टक्के प्रयत्न करेन. मला खेळायला खूप आवडेल..."

तन्वी पुढे मुलाखतीत म्हणाली की, "राखीचीच इच्छा आहे की, मी हिंदी बिग बॉसमध्ये जावे. ती घरात म्हणायची की, तू हिंदी बिग बॉस मटेरियल आहेस. तू छान खेळशील...बिग बॉसच्या घरात गेले होते तेव्हा तन्वी कोलते म्हणून गेले होते, मात्र बाहेर तन्वी कोलते ब्रँड म्हणून आली आहे. तो ब्रँड माझ्या जनतेने मोठा केला आहे...."

तन्वी कोलतेने मराठी मालिका 'लक्ष्मी निवास' मध्ये काम केले आहे. 'लक्ष्मी निवास' नंतर तन्वीने 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात पाऊल ठेवले आणि गेमने प्रेक्षकांचे मन जिंकले. तन्वी कोलते बिग बॉसच्या घरात 'काटा' गटाची सदस्य होती.आपला यशस्वी गेम खेळत तन्वी पहिली 'बिग बॉस मराठी ६' ची पहिली फायनलिस्ट बनली. तिने 'तिकिट टू फिनाले' जिंकले. तन्वी कोमलतेचे आगामी प्रोजेक्ट पाहण्यासाठी चाहते आता खूपच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT