Bigg Boss Marathi 6 Winner Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 Winner: बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव फिनालेपूर्वीच लीक; 'हा' स्पर्धक जिंकणार ट्रॉफी!

Bigg Boss Marathi 6 Winner: बिग बॉस मराठी 6 च्या फिनालेआधी विजेत्याचे नाव लीक झाल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर व्हायरल पोस्टमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss Marathi 6 Winner: ‘बिग बॉस मराठी 6’ सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून, ग्रँड फिनालेपूर्वीच विजेत्याचे नाव लीक झाल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि संभ्रम दोन्ही वाढले आहेत.

या सीझनमध्ये अनुश्री माने, तन्वी कोलते, विशाल कोटियन, राकेश बापट आणि दीपाली सय्यद हे टॉप 5 फायनलिस्ट म्हणून समोर आले आहेत. या सर्वांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत असून, कोण विजेता ठरणार याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका स्क्रीनशॉटमध्ये विशाल कोटियन विजेता ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच तन्वी कोलते पहिली रनर-अप, अनुश्री माने दुसरी रनर-अप असल्याचेही या फोटोमध्ये दिसून येत आहे. मात्र आतापर्यंत या व्हायरल फोटोवर कलर्स टिव्हीने कोणत्याही प्रकारचे एक्शन घेतलेले नाही आहे.

रिअलिटी शोमध्ये अशाप्रकारचे अंदाज नेहमी लावले जातात त्यामुळे याबद्दल यापूर्वी देखील अनेक अंदाज लावण्यात आले आहेत. काही सोशल मीडिया पोस्टनुसार या शोमध्ये राकेश बापट हा ट्रॉफी उचलणार असल्याचे बोलले जात आहे. तर तन्वी कोलते पहिली रनर-अप असेल अशी पोस्ट व्हायरल होत आहे.

रिअॅलिटी शोच्या इतिहासात अशा प्रकारच्या ‘लीक’ पोस्ट्स अनेकदा व्हायरल होत असतात. त्यामुळे या दाव्यांवर पूर्ण विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही, असेही काही चाहत्यांचे मत आहे. शोच्या निर्मात्यांकडून किंवा अधिकृत प्लॅटफॉर्मवरून विजेत्याची घोषणा होईपर्यंत ही माहिती केवळ अफवा मानली जात आहे. आता खरा विजेता कोण ठरणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना फिनाले एपिसोडची वाट पाहावी लागणार आहे. हा फिनाले १९ मार्च रोजी रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या आरोपानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी 2.30 पर्यंत स्थगित

Rahul Gandhi speech : "अमित शाह यांनीच गोळीबाराचा आदेश दिला," राहुल गांधींचा थेट आरोप; रिजिजू म्हणाले माफी मागा, नाहीतर...

महिनाभर रोज एक बदाम खाल्ल्यास शरीरात काय बदल होतील?

Soaked figs: 1 महिना नियमित भिजवलेले अंजीर खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

SCROLL FOR NEXT