Bigg Boss Marathi 6 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातून आणखी एका स्पर्धकाची एक्झिट, अवघ्या महिन्याभरात संस्कृतीनं गाशा गुंडाळला

Sanskruti Salunke Eliminated From BB House : 'बिग बॉस मराठी ६'मध्ये १० व्या आठवड्याचे एलिमिनेशन पार पडले आहे. बिग बॉसच्या घरातून संस्कृती साळुंके बाहेर गेली आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी ६' चे दहाव्या आठवड्याचे एलिमिनेशन पार पडले.

भाऊच्या धक्क्यावर संस्कृती साळुंके घराबाहेर पडली.

संस्कृती साळुंकेने घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती.

'बिग बॉस मराठी ६' दहावा आठवडा संपला असून आता अकराव्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. बिग बॉसचा खेळ आता हळूहळू शेवटच्या टप्प्यावर येत आहे. काल भाऊच्या धक्क्यावर घरातील एका सदस्याने निरोप घेतला. अकराव्या आठवड्यात विशाल घराचा कॅप्टन आहे. त्यामुळे घरात चांगलाच राडा पाहायला मिळणार आहे. रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्यावर राखी सावंतची चांगलीच कानउघडणी केली. तसेच तिला शिक्षा देखील दिली.

'बिग बॉस मराठी 6'च्या दहाव्या आठवड्यात एकूण 7 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यांची नावे खालील प्रमाणे-

  • विशाल कोटियन

  • संस्कृती साळुंके

  • सागर कारंडे

  • रेवा कौरासे

  • प्रभू शेळके

  • राकेश बापट

  • दिपाली सय्यद

बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात वाइल्ड कार्ड स्पर्धक संस्कृती साळुंके घराचा निरोप घेणार आहे. शेवटी Danger झोनमध्ये दिपाली सय्यद आणि संस्कृती साळुंके होती. प्रेक्षकांचे मन जिंकण्यास संस्कृती साळुंके अपयशी ठरली. त्यामुळे कमी मते मिळाल्यामुळे संस्कृती साळुंकेची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाली. या आठवड्यात संस्कृतीने अनुश्री आणि प्रभूसोबत मोठे भांडण केले. रितेश भाऊंनी देखील संस्कृतीला गेम सुधारण्यास सांगितले होते.

काल भाऊच्या धक्क्यावर 'मोहिनी' मालिकेची टीम आली होती. त्यांनी घरातील सदस्यांना गेमसाठी खूप शुभेच्छा देखील दिला. सर्वांचे कौतुक केले. संस्कृती साळुंकेन आजवर अनेक रिअ‍ॅलिटी शो केले आहेत. ती 'जाऊ बाई गावात' या मराठी रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात सहभागी झाली होती. आता बिग बॉसच्या अकराव्या आठवड्यात कोण नॉमिनेट होणार आणि कोण घराचा निरोप घेणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळतो.

'बिग बॉस मराठी ६' चे स्पर्धक

'बिग बॉस मराठी ६' मध्ये आता एकूण दहा स्पर्धक उरले आहेत. यात विशाल, राकेश, दीपाली, तन्वी, प्रभू, सागर, रेवा, संकेत, अनुश्री आणि राखी सावंत यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवतपाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ होरपळला , ब्रह्मपुरीचा पारा तब्बल ४७.६ अंशांवर

Onion: मातीमोल कांदा, खिशाला भुर्दंड; कांदा अजून किती दिवस शेतकऱ्याला रडवणार?

Shocking : हृदयद्रावक! आजीच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या ३ नातींवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून मृत्यू

Petrol Price Hike: महागाईचा स्फोट! पेट्रोल 10 दिवसांत 7.50 रुपयांनी महागले, तुटवडा असतानाच दरवाढीचा भडका

सकाळच्या नाश्त्याचं टेन्शन मिटलं! रक्तातील साखर वाढू नये म्हणून खा 'हे' 5 पदार्थ

SCROLL FOR NEXT