Bigg Boss Marathi 6 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : अखेर बिग बॉसने घराच्या 'व्हिलन'ला दाखवला बाहेरचा रस्ता; विशालने रुचिताला दिली 'ती' प्रेमाची वस्तू|VIDEO

Ruchita Jamdar Eliminated From BB House : बिग बॉसच्या घरातून रुचिताचा प्रवास संपला आहे. रुचिता घरातून जाताना विशाल खूप भावुक होतो आणि रडतो. घरात नेमकं काय झाले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरात आठव्या आठवड्याचे एलिमिनेशन पार पडले.

रुचिता जामदारने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला.

रुचिताच्या एक्झिटनंतर विशाल खूप रडला.

'बिग बॉस मराठी 6' चा (Bigg Boss Marathi 6) आठवा आठवडा संपला आहे. बिग बॉसच्या घरातून तंटा क्वीन रुचिता जामदारचा पत्ता कट झाला. बिग बॉसने रुचिताला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ज्यामुळे घरातील सदस्यांना मोठा धक्का बसतो. तसेच विशालला खूप मोठा शॉक बसतो. तो खूप रडताना दिसला. बिग बॉसमध्ये पहिल्या दिवसापासून विशाल आणि रुचिताची मैत्री चांगलीच चर्चेत होती. अखेर रुचिता आणि विशालने बिग बॉसच्या घरात आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला, भांडणे देखील झाली.

प्रत्येक भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख रुचिताची शाळा घ्यायचा. तिला तिच्या चुका दाखवायचा. शनिवारी झालेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने राखी आणि रुचिताला प्रेमाच्या नात्यांचे महत्त्व सांगितले. रुचिता आणि विशालच्या नात्यामुळे रुचिताच्या गेमवर फरक पडू लागला, ज्यामुळे तिला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला. तसेच प्रेक्षकांनी तिला कमी मते दिली. वयाने मोठ्या असलेल्या मुलासोबत प्रेम प्रकरण, घरात सतत भांडणे, मोठ्या आवाजात बोलणे यामुळे रुचिता खूप ट्रोल झाली.

शेवटच्या क्षणी Danger झोनमध्ये रुचिता जामदार आणि सागर कारंडे पाहायला मिळतात. त्यानंतर रितेश भाऊ प्राजक्ता आणि विशालला स्टोर रूमध्ये ठेवलेले Envelope आणायला सांगतो. ज्यात सागर सुरक्षित होतो आणि रुचिता एलिमिनेट होते. घरातून जाताना विशाल रुचिताला घट्ट मिठी मारतो आणि दोघेही खूप रडतात. त्यानंतर विशाल त्याचे जॅकेट रुचिताला देतो.

रुचिताच्या घराबाहेर जाण्याने 'टोळी' कायमची तुटली आहे. त्यामुळे विशाल घरात एकटा पडला आहे. आता विशालचा नवीन गेम प्लान काय असणार, पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच बिग बॉसच्या घराबाहेर विशाल आणि रुचिताचे नाते किती टिकणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तसेच बिग बॉसच्या घरात विशाल आणि संस्कृती मैत्री देखील वाढताना दिसत आहे, त्यामुळे येणारे भाग खूपच खास असणार आहे.  'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्य सरकारने माहितीच्या अधिकारात बदल

या 5 चुकांमुळे चेहऱ्यावर येतात पिंपल्स

ठाकरेसेनेचा व्हीप फुटीर खासदारांनी झुगारला, बंडखोर खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

Friday Horoscope: अनोळखी लोकांवर लगेच विश्वास ठेवणं टाळा; वाचा आजचं राशीभविष्य

Famous Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचं ३६ व्या वर्षी निधन; पोटाच्या कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT