Bigg Boss Marathi 6  saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : "रंग बदलताना दिसत आहेत लोक..."; दीपाली अन् राकेशची मैत्री तुटली? पाहा VIDEO

Dipali Sayyad- Raqesh Bapat Friendship Break : बिग बॉसच्या घरात मोठा राडा झाला आहे. दीपाली सय्यद आणि राकेश बापट यांच्या मैत्रीत फूट पडली आहे. नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरात 8 सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत.

दीपाली सय्यद आणि राकेश बापट यांच्या मैत्रीत फूट पडली आहे.

दीपाली आणि राकेशमध्ये मोठे भांडण होते.

'बिग बॉस मराठी 6' सुरू होऊन तीन आठवडे झाले आहेत. पहिल्या दिवसापासून घट्ट वाटणारी दिपाली आणि राकेशची मैत्री आता तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. एकमेकांसाठी उभे राहणारे, प्रत्येक टास्कमध्ये पाठिंबा देणारे हे दोन मित्र आता समोरासमोर भिडताना दिसत आहेत. नेमकं बिग बॉसच्या घरात असं काय घडलं की त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला? हे जाणून घेऊयात. बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओत राकेश दिपालीवर थेट आरोप करताना दिसतोय.

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, राकेश दिपालीला म्हणातो, "रंग बदलताना दिसत आहेत लोक..." त्यावर दीपाली म्हणते की, "रंग बदलताना मला त्या दिवशीच दिसले नॉमिनेशनच्या वेळी..." यावर पुन्हा राकेश म्हणतो, "दिव्या माझी बहीण आहे...मी तिला सपोर्ट करणार..." त्यावर दीपालीने प्रश्न करते की, "मी तुझी मैत्रीण नव्हते? तू Neutral राहायला हवं होतंस... प्रत्येकजण स्वतःसाठी खेळत आहे इकडे..." शेवटी राकेश बोलतो की," thankless असतात लोकं..."

बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात बाहेर जाण्यासाठी आठ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. ज्यात सोनाली राऊत, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, ओमकार राऊत, रुचिता जामदार यांचा समावेश आहे. आता बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात कोण बाहेर जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राकेश आणि दीपाली यांच्यातील तीव्र वादामुळे घरातले वातावरण बदलणार आहे. आता राकेश आणि दीपाली यांच्यातील मैत्री कायमची संपणार की पुन्हा दोघांमध्ये मैत्री होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच त्यांच्यातील भांडणाचा घरातील कोणाला फायदा होतो, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suryakumar Yadav: चौथ्या सामन्यात प्रयोग करणं पडलं भारी; सामन्यानंतर कर्णधार सूर्याने सांगितलं कुठे गमावला सामना

Maharashtra Live News Update : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

Ajit Pawar Funeral: वडिलांचं शेवटचं दर्शन घेताना पायावर डोकं ठेवून जय पवार ढसाढसा रडले, काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : कामाचा माणूस हरपला! अजित पवारांना पार्थ पवार यांनी मुखाग्नी दिला, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

Ajit Pawar Funeral : महाराष्ट्र पोरका! जनसामान्यांचे 'दादा' अनंतात विलीन; बारामतीत लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप

SCROLL FOR NEXT