Bigg Boss Marathi 6 Double Elimination Saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसमध्ये होणार डबल एव्हिक्शन; प्रभू शेळकेच्या पाठोपाठ 'हा' स्पर्धक जाणार घराबाहेर

Bigg Boss Marathi 6 Double Elimination: बिग बॉसच्या घरात डबल एव्हिक्शनमुळे मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. प्रभू शेळकेसह आणखी एक स्पर्धक बाहेर पडल्याने प्रेक्षकांना मोठाी धक्का बसणार आहे.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss Marathi 6 Double Elimination : मराठीतील फेमस रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी ६ मध्ये या आठवड्यात प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये यावेळी एक नव्हे, तर दोन स्पर्धकांना घराबाहेर जावे लागले. प्रभू शेळकेसह आणखी एका चांगल्या स्पर्धकाचा प्रवास अचानक संपल्याने घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला आहे.

या आठवड्यात एकूण सात स्पर्धक नॉमिनेट झाले होते. त्यामध्ये दिपाली सय्यद, प्रभू शेळके, राकेश बापट, रेवा कौरासे, अनुश्री माने, सागर कारंडे आणि संकेत पाठक यांचा समावेश होता. नेहमीप्रमाणे एकच स्पर्धक बाहेर पडेल, अशी अपेक्षा असताना यावेळी डबल एव्हिक्शनची घोषणा करण्यात आली. रितेश देशमुख यांनी ‘भाऊचा धक्का’दरम्यान ही माहिती दिल्यानंतर सर्वच सदस्य घाबरले.

प्रोमोमध्येही रितेशने स्पष्ट केले होते की, यावेळी ‘काटा गँग’ आणि ‘टोळी’ या दोन्ही गटांमधील प्रत्येकी एक सदस्य घराबाहेर जाणार आहे. या घोषणेनंतर घरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. अखेरीस ‘काटा गँग’मधील प्रभू शेळके यांचा प्रवास संपला. त्यानंतर ‘टोळी’मधला वाइल्ड कार्ड एन्ट्री असलेला संकेत पाठक हा दुसरा स्पर्धक म्हणून बाहेर पडला.

प्रभू शेळकेच्या एव्हिक्शनमुळे त्याच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. घरात त्याची ओळख ‘छोटा डॉन’ म्हणून होती आणि त्याच्या खेळीमुळे तो चर्चेतही राहिला होता. दुसरीकडे, संकेत पाठकने वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे घरात प्रवेश केला होता आणि कमी वेळात स्वतःची वेगळी छाप पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रेक्षकांकडून अपेक्षित मत न मिळाल्याने त्यालाही घर सोडावे लागले. प्रभू शेळके आणि संकेत पाठक यांच्या बाहेर पडण्यामुळे आता उरलेल्या स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी चुरस वाढली आहे. प्रेक्षकांमध्येही पुढे कोण विजेता ठरणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशाच्या सुरक्षेला बूस्ट; शिर्डीतून होणार अत्याधुनिक शस्त्रनिर्मिती, वर्षाला 5 लाख तोफगोळे तयार होणार

Vande Bharat Train: मुंबई ते शिर्डी; वंदे भारत ट्रेनने प्रवास करुन मुख्यमंत्र्यांना कसा वाटला?

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत संथ गतीने काँक्रिटकरण सुरू,मनसे आक्रमक

'कॉकरोज जनता पार्टी'ला आणखी एका धक्का; 1000000 सदस्य असलेल्या पक्षाची अधिकृत वेबसाइट बंद

Weight Loss: जीरा वॉटर की चिया सिड्स? वजन कमी करण्यासाठी कोणता ऑप्शन ठरेल बेस्ट?

SCROLL FOR NEXT