Bigg Boss Marathi 6  saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 Video : बिग बॉसच्या घरातून 'या' सदस्याची Exit; तन्वी ढसाढसा रडली, रितेश भाऊंनी गेमच पलटवला

Bigg Boss Marathi 6 - Double Elimination : 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात डबल एलिमिनेशन पार पडणार आहे. रितेश भाऊंनी सदस्यांना मोठा धक्का दिला आहे. कोण घराबाहेर जाणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी ६' च्या घरात ११ वा आठवडा सुरू आहे.

बिग बॉसमध्ये डबल एलिमिनेशन होणार आहे.

घरातील एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

'बिग बॉस मराठी ६' चे मोठे अपडेट समोर आले आहे. आता बिग बॉसच्या घरात 11 वा आठवडा सुरू आहे. बिग बॉस आता शेवटच्या टप्प्यावर आले आहे. या आठवड्यात घरात डबल एलिमिनेशन होणार आहे. ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.या आठवड्यात कठपुतली असणाऱ्या सदस्यांना नॉमिनेट करण्यात आले होते. ज्यांचा स्वतःचा खेळ दिसत नाही आणि जे दुसऱ्यांच्या डोक्याने चाहतात, असे सदस्य नॉमिनेट झाले. यात एकूण सात सदस्यांचा समावेश आहे.

नॉमिनेट झालेले सदस्य

  • दिपाली सय्यद

  • प्रभू शेळके

  • राकेश बापट

  • रेवा कौरासे

  • अनुश्री माने

  • सागर कारंडे

  • संकेत पाठक

नुकताच बिग बॉसचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यात रितेश भाऊंनी सांगितल्यानुसार, या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर जाणार आहेत. एक सदस्य काटा गँग मधला आहे आणि एक सदस्य टोळीतला आहे. डबल एलिमिनेशन ऐकताच घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. व्हिडीओत पाहू शकता की, काटा गँगचे नॉमिनेट झालेले सदस्य एकत्र उभे असतात (दिपाली, प्रभू, रेवा, राकेश) त्यानंतर व्हिडीओच्या शेवटी तन्वी "नाही...." असे बोलत ढसाढसा रडते. आता यामुळे सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू झाली आहे की, या आठवड्यात प्रभू घराबाहेर गेला.

प्रभूच्या घरातील एक्झिटचा सर्वात मोठा धक्का तन्वीला बसणार, कारण बिग बॉसच्या घरात त्यांचे नाते आधी पासून घट्ट दाखवले आहे. सोशल मीडियावर प्रभूला छोटा डॉन म्हणून ओळखले जाते. प्रभूला स्वतःचे मत नाही तो तन्वीचे ऐकतो, ती सांगते तसा खेळतो असे बोले जाते. तसेच प्रभू सिंपथी कार्ड प्ले करतो असे अनेकांचे मत आहे. प्रभूच्या एक्झिटने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र अद्याप प्रभूच्या एक्झिटची कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

बिग बॉसचा हा आठवडा खूप भावनिक राहिला, कारण घरातील सदस्यांना त्यांचे कुटुंब भेटायला आले. ज्यामुळे स्पर्धक खूप भावुक झाले. सदस्यांनी आपल्या कुटुंबासोबत खूप छान वेळ घालवला. या आठवड्यात तन्वी कोलते घराची कॅप्टन झाली आहे. ती बिग बॉसच्या घरात दुसऱ्यांना कॅप्टन बनते. आता टोळीमधून (अनुश्री माने, सागर कारंडे, संकेत पाठक ) कोण बाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT