Bigg Boss Marathi 6 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलते नाही तर 'हा' सदस्य मारणार बाजी, उचलणार 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी?

Bigg Boss Marathi 6 Winner : सध्या सर्वत्र 'बिग बॉस मराठी ६' ची चर्चा पाहायला मिळत आहे. तन्वी कोलतेवर प्रेक्षक नाराज असल्याचे दिसून येते आहे, त्यामुळे ट्रॉफीचा मान दुसऱ्या सदस्याला मिळणार असल्याची दिसत आहे.

Shreya Maskar

मिड-वीक एलिमिनेशनमध्ये रेवा कौरासेने घराचा निरोप घेते.

'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड फिनाले काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

प्रेक्षक तन्वी कोलतेवर नाराज असल्याचे दिसत आहे.

'बिग बॉस मराठी ६' सुरुवातीपासून चर्चेत राहिले. कधी सदस्यांमधील भांडणे, राडा, मैत्री, प्रेम यांमुळे तर कधी रितेश भाऊंच्या भाऊच्या धक्क्यामुळे. 'बिग बॉस मराठी ६'ला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. आता 'बिग बॉस मराठी ६' शेवटच्या टप्प्यावर आले आहे. 'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड फिनाले काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

शेवटच्या टप्प्यावर येऊन रेवा कौरासे घराचा निरोप घेते. रेवा कौरासेने बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या सुरूवातीपासून विजेतेपदासाठी तन्वी कोलतेचे नाव आघाडीवर आहे. मात्र आता प्रेक्षक तिच्यावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे 'बिग बॉस मराठी ६' विजेते म्हणून दुसऱ्याच नावाची चर्चा पाहायला मिळत आहे.

नेमकं घडलं काय?

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रेवा कौरासे घरातून बाहेर पडणार याची घोषणा होते. ज्यामुळे तन्वी खूपच दुखावते कारण बिग बॉसच्या घरात प्रभूनंतर तन्वीचा रेवासोबत छान नातं निर्माण झाले असते. तेव्हा तन्वी बोलते की, "आज खोटारडेपणा आणि धक्काबुक्की इथे राहिली आणि माझ्या चांगल्या मनाची पोरगी थेट घरातून बाहेर चालली..." त्यावर अनुश्री उत्तर देत बोलते की, "आमचं मन नाही चांगले, आम्ही मनातूनच घाण आहोत..."

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर तन्वी विरोधात कमेंट्स पाहायला मिळत आहे. तर प्रेक्षक अनुश्रीची बाजू घेत आहेत. तन्वीसाठी एका युजरने लिहिलं की, "तिचे मन चांगले असते तर ती कधीच असे बोलली नसती...", दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, "तन्वी खूप हवेत आहे. गर्वाच घर खाली येणार नि जनताच आणणार, विजेता राकेश किंवा अनुश्री होणार..." तर तिसऱ्या युजरने लिहिलं की," तन्वी फेक आहे, हे तिचा वागण्यातून दिसते आणि आता तर बोलून दाखवले..." सुरूवातीपासून तन्वी कोलतेला पाठिंबा देणारी जनता आता तिच्यावर नाराज आहे. प्रेक्षक अनुश्री माने आणि राकेश बापटला पाठिंबा देत आहेत.

टॉप-५ फायनलिस्ट कोण?

  • तन्वी कोलते

  • राकेश बापट

  • अनुश्री माने

  • विशाल कोटियन

  • दिपाली सय्यद

ग्रँड फिनाले कधी?

‘बिग बॉस मराठी ६’ ग्रँड फिनाले 19 एप्रिल 2026 ला म्हणजेच येणाऱ्या रविवारी होणार आहे. ग्रँड फिनाले रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळेल.व्होटिंग लाइन्स शनिवार 18 एप्रिल दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. ‘बिग बॉस मराठी ६’ ची ट्रॉफी कोण उचलणार हे ग्रँड फिनालेला रितेश भाऊ सांगतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : विदर्भासह महाराष्टात सूर्य कोपला, उष्णतेचा इशारा

Accident : सकाळी भाविकांच्या बसवर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेत ८ जणांचा जागीच मृत्यू, १२ गंभीर

Horoscope Today: ३ राशींवर आज स्वामींची कृपा, धनलाभ होणार; पाहा तुमच्या नशिबात काय आहे?

Fort In Maharashtra : समुद्राच्या कुशीत वसलेला अजिंक्य किल्ला; मराठा, इंग्रज अन् पोर्तुगीजांनाही जिंकता आला नाही

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये मराठीला बंदी, मध्य रेल्वेचा मराठीद्वेष उघड

SCROLL FOR NEXT