Bigg Boss Marathi 6 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : शेवटच्या क्षणी बाजी पलटली; 'या' सदस्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला, नाव वाचून बसेल धक्का

Bigg Boss Marathi 6 - Elimination : शेवटच्या टप्प्यावर येऊन बिग बॉसच्या घरातील लोकप्रिय अभिनेता बाहेर पडला आहे. सोशल मीडियावर एकाच नावाची चर्चा पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरात बाहेर जाण्यासाठी ६ सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

१२ व्या आठवड्यात प्रसिद्ध अभिनेता बिग बॉसच्या घरातून निरोप घेणार आहे.

भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख राकेश आणि विशालची शाळा घेतो.

बिग बॉसच्या घरात आता १२ वा आठवडा सुरू आहे. 'बिग बॉस मराठी 6' सुरू होऊन आता अडीच महिने झाले आहेत. रोज नवीन राडा आणि भांडणे पाहायला मिळत आहे. राखी सावंतने तर घरात धुमाकूळ घातला आहे. या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी ६ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन टास्कमध्ये राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यामध्ये तुफान भांडणे होतात. दोघांमध्ये हाणामारी देखील होते. यावरून रितेश भाऊ राकेश बापट आणि विशालची चांगली शाळा घेतली. त्याच्या रागीट स्वभावावर खूप बोलतो.

नॉमिनेट झालेल्या सदस्यांची नावे

  • राखी सावंत

  • राकेश बापट

  • अनुश्री माने

  • सागर कारंडे

  • रेवा कौरासे

  • विशाल कोटियन

'बिग बॉस मराठी ६' च्या १२ व्या आठवड्यात सागर कारंडे घराला रामराम ठोकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. म्हणजेच या आठवड्यात प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन सागर कारंडे बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार असल्याचे बोले जात आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. आज रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावर याचा खुलासा करतील. सागर कारंडे 'चला हवा येऊ द्या' मधून खूप लोकप्रिय झाला.

सागर बिग बॉसच्या घरात स्वतंत्र गेम खेळताना दिसला नाही. तो कायम कोणासोबत तरी असतो. या आठवड्यात सागर कारंडे अनुश्री आणि विशालसोबत दिसला. सागर कारंडेला नेटकरी डबल ढोलकी बोलत आहेत. प्रेक्षकांना त्याचा दुटप्पीपणा खटकला. सागर कारंडेची टॉप ७ मध्ये जाण्याची संधी थोडक्यात हुकली आहे.आता बिग बॉसच्या घरात लवकरच ग्रँड फिनाले पार पडणार आहे. विजेत्यांच्या नावांमध्ये तन्वी कोमलतेचे नाव चर्चेत आहे.  'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT