Suraj Chavan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : "जी होती मनात तीच..."; लग्नानंतर सूरजची बायकोसाठी पहिली रोमँटिक पोस्ट

Suraj Chavan Romantic Post : लग्नानंतर सूरज चव्हाणने बायकोसाठी पहिली रोमँटिक पोस्ट केली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये नेमकं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सूरज चव्हाण आणि संजना लग्न बंधनात अडकले आहेत.

सूरज चव्हाणने बायकोसाठी एक खास रोमँटिक पोस्ट केली आहे.

सूरज चव्हाण बायकोसोबत देव दर्शनाला गेला आहे.

'बिग बॉस मराठी 5'मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेला अभिनेता सूरज चव्हणने लग्न केले आहे. त्याने 29 नोव्हेंबरला मामाची मुलगी संजनासोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्न सोहळ्यात हळदीपासून ते लग्नापर्यंत सर्व समारंभ थाटामाटात पार पडले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. लग्नानंतर सूरज आणि संजना देव दर्शनाला गेले आहेत. सूरज खूप आनंदी दिसत आहेत.

सूरज चव्हाणने बायकोसोबतचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. ज्यात दोघेही खूपच सुंदर आणि रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. सूरज चव्हाणने कुर्ता आणि पॅन्ट परिधान केली आहे. तर संजनाने सुंदर लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. ड्रेसला मॅचिंग ज्वेलरी, मिनिमल मेकअपमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. सूरजने या फोटोला खूप हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "जी होती मनात तीच बायको केली,Love Marriage Successful..."

सूरज चव्हाणने पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. "महाराष्ट्राची फेवरेट जोडी ठरणार सूरज आणि संजना, जोडीला कोणाची नजर लागायला नको...", "असचं खुश रहा भावा, अभिनंदन खूप खूप...","असेच खुश राहा दोघेपण...आयुष्य भर सोबत राहा... सुखदुःखात जसे आजपर्यंत साथ देत आलात एकमेकांना तसेच आयुष्यभर देत राहा...तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि संसारासाठी खुप खुप शुभेच्छा..." अशा कमेंट्स पोस्टवर येत आहेत.

सूरज चव्हाणच्या लग्नात बिग बॉसची किलर गर्ल जान्हवी किल्लेकर दिसली. तिने संपूर्ण लग्न सोहळ्यात सूरज चव्हाणची साथ दिली. जान्हवी सूरजला आपला भाऊ मानते. तिने सूरजचा लग्नाची भेटवस्तू म्हणून एक सोन्याची अंगठी दिली. जान्हवी आणि सूरजने लग्नात तुफान डान्स केला. सूरज चव्हाण आणि त्याची बायको संजना यांचा प्रेम विवाह आहे. हे दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Signs Of Heart Failure: मानेची ही एक टेस्ट सांगेल हार्ट अटॅक येणारे; अवघ्या २० मिनिटात कळेल धोका किती?

Satellite Based Toll System: नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला स्थगिती; आता सॅटेलाइटद्वारे टोल वसुली होणार नाही

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन, भाजपविरोधात आक्रमक

Mumbai : मुंबईतील स्टेशनवर बेवारस बॅगेत सापडलं लाखोंचं घबाड, पैसे नेमके कुणाचे? पोलिसांना समजताच...

Maharashtra Nagar Parishad Live : बीडमध्ये निवडणुकीला हिंसक वळण, दोन गटात राडा अन् दगडफेक

SCROLL FOR NEXT