Suraj Chavan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Suraj Chavan Dance Video : 'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हाणची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. नुकतीच त्याने रितेश देशमुखच्या गाण्यावर बनवलेली रील सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाणचे (Suraj Chavan) कौतुक होताना पाहायला मिळत आहे. बिग बॉसमुळे सूरजला खूप लोकप्रियता मिळाली. बिग बॉस संपल्यानंतर गुलीगत सूरज पुन्हा एकदा आपल्या स्टाइलने चाहत्यांना वेड लावले आहे. त्यांने पुन्हा रील बनवायला सुरूवात केली आहे. त्याचे रील प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

गुलीगत सूरजने आपल्या सोशल मीडियावर नुकतीच रितेश भाऊंच्या (Riteish Deshmukh) गाण्याची बनवलेली रील शेअर केली आहे. या व्हिडीओवर चाहत्यांच्या तुफान कमेंट्स पाहायला मिळत आहेत. सूरज रितेश देशमुखच्या 'मला वेड लावलंय' (Mala Ved Lavlay) गाण्यावर थिरकताना दिसला आहे. हे गाणे रितेश देशमुखच्या लोकप्रिय चित्रपट 'वेड' यातील आहे. या व्हिडीओ चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. एका युजरने लिहिलं की, "महाराष्ट्राला वेड लावणारा सूरज" तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, "सूरजला लग्नाची घाई..." इतर नेटकरी म्हणतात "सूरज लय भारी..."

मोढवे गावचा मुलगा आता अवघ्या महाराष्ट्राचा लेक झाला आहे. बिग बॉसच्या घरात बिग बॉसची ट्रॉफी उचलण्याबाबत त्याला नेहमीच आत्मविश्वास होता. रितेश भाऊंनी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. सूरजने आपल्या गुलीगत शैलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सूरज केदार शिंदे यांच्या आगामी 'झापुक झुपूक' सिनेमात झळकणार आहे. तर पुढच्या वर्षी तो आपल्या नवीन घरात प्रवेश करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पनवेल ते सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमधून तरुण पडला

Home Loan: घर खरेदी करणाऱ्यांच्या कामाची बातमी! ६० लाखांच्या होम लोनवर वाचवता येणार १९ लाख; ही ट्रिक वापरा

Face Care: रात्री मेकअप रिमूव्ह न करता झोपल्यास काय होते?

GK: तुम्हाला माहितेय का? 'हा' एक देश एका दिवससाठी भारताची राजधानी बनले

Betrayal Indian history: एकाच्या दगाबाजीने बदलला देशाचा इतिहास; कोण होता तो गद्दार राजा?

SCROLL FOR NEXT