Suraj Chavan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : भरत जाधव यांच्या भेटीने भारावून गेला सूरज चव्हाण, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला...

Suraj Chavan Meet Bharat Jadhav : 'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हाणने मराठी अभिनेते भरत जाधव यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचा खास व्हिडीओ सूरजने सोशल मीडियावर शेअर केला असून त्यांच्यासाठी एक खास कॅप्शन देखील लिहिले आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi 5) विजेता सूरज चव्हाणचा (Suraj Chavan) 'झापुक झुपूक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'झापुक झुपूक' चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. अलिकडेच या चित्रपटाचे शूटिंग पू्र्ण झाले आहे. 'बिग बॉस मराठी 5' सूरज विजेता झाल्यानंतर तो कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहीला आहे. कधी त्याचा चित्रपट तर कधी त्याचे नवीन घर. मात्र आता सूरज एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

गुलीगत सूरजने मराठीचे दिग्गज अभिनेते भरत जाधव (Suraj Chavan) यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचा खास व्हिडीओ सूरजने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सूरज भरत जाधव यांच्या पाया पडताना आणि त्यांना मिठी मारताना दिसत आहे. तसेच त्यांनी हात देखील मिळवले आहेत. एकमेकांशी गप्पा मारताना ते व्हिडीओमध्ये दिसत आहेत. सूरज आणि भरत जाधव व्हिडीओमध्ये खूप आनंदी दिसत आहेत.

सूरजने व्हिडीओला एक खास कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "भरत जाधव सर मला लय आवडतात...त्यांचे चित्रपट पाहून खूप हसायला येते. काल त्यांची भेट झाली. सर खूपच भारी आहेत. त्यांनी मला 'झापुक झुपूक' चित्रपटासाठी खूप शुभेच्छा दिल्या आणि खूप प्रेमाने वेळ दिला. भरत सर खूप खूप आभार...भावानों आज मी खूप खुश आहे. होळीच्या आणि रंगपंचमीच्या झापुक झुपूक गुलीगत शुभेच्छा...!‎"

सूरजने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'झापुक झुपूक' चित्रपट 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील शनिपार मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी साकारला ३५ फूट "देवमासा"

Sunday Horoscope : वेळ अन् पैसा वाया जाणार; ५ राशींच्या लोकांचे महत्वाचे कामे रखडणार, वाचा रविवारचं राशीभविष्य

Malavya Rajyog: 12 महिन्यांनी बनणार मालव्य राजयोग; 'या' ३ राशींवर शुक्राची राहणार कृपा, धनलाभ होणार

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT