Suraj Chavan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : सूरज चव्हाणचा स्वॅग लय भारी! 'शाहीर दादा कोंडके' पुरस्कारानं सन्मानित, पाहा VIDEO

Suraj Chavan Get Award : 'झापुक झुपूक' स्टार सूरज चव्हाणला 'शाहीर दादा कोंडके' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या खास क्षणाचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाण सध्या त्याच्या 'झापुक झुपूक' चित्रपटामुळे चांगला चर्चेत आहे. 'बिग बॉस मराठी 5'ची विजेता झाल्यापासून सूरजला खूप प्रसिद्धी मिळत आहे. अलिकडेच त्याने आपल्या साखरपुड्याचा प्रँक चाहत्यांसोबत एका होता. आता सूरज चव्हाण एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सूरज चव्हाणला दादा कोंडके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे.

सूरज चव्हाणने (Suraj Chavan ) आजवर केलेल्या कामाचे यश झाले आहे. त्याच्या आयुष्यातील एका खास क्षणाचा त्याने व्हिडीओ शेअर केला आहे. सूरज चव्हाणला 'स्वर्गीय शाहीर दादा कोंडके' ( Shahir Dada Kondke Award ) पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. याचा खास व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याने या व्हिडीओला एक हटके कॅप्शन दिलं आहे. सूरजने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "तुमच्या आख्यांच्या प्रेमामुळे मला 'दादा कोंडके' यांच्या नावाने पुरस्कार मिळाला. लय भारी वाटतय... असंच प्रेम राहुद्या "

सूरज चव्हाणला हा मोठा पुरस्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात प्रदान करण्यात आला. सूरज चव्हाणच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते कमेंटमध्ये त्यांच्या वर कौतुकाचा आणि प्रेमाचा पाऊस पाडत आहेत. 'बिग बॉस मराठी 5' च्या शो मधील सूरजचा खेळ चाहत्यांना खूप आवडला. त्याच्या साध्या भोळ्या स्वभावाने चाहत्यांना वेड लावले. सूरज चव्हाणला अनेक वेळा ट्रोल देखील करण्यात आले मात्र त्याने या सर्व गोष्टींवर मात करत हे यश मिळवले आहे.

बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी सूरज चव्हाण टिक टॉक आणि इन्स्टाग्रामवर व्हिडीओ बनवायचा. त्याचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्याचे एकूण 2.7 मिलियन इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत. तो आजही रीलमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

SCROLL FOR NEXT