Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : झापुक झुपूक म्हणत गुलीगत पॅटर्नची महाराष्ट्रात हवा, ट्रॉफी उचलल्यावर सूरजची पहिली प्रतिक्रिया

Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी 5'ची ट्रॉफी जिंकल्यावर सूरज चव्हाणने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घ्या सूरज काय बोलला.

Shreya Maskar

काल महाराष्ट्राला त्याच्या 5 बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) विजेता मिळाल. बिग बॉसची ट्रॉफी उचलण्याचा मान सूरज चव्हाणने मिळवला आहे. सूरजच्या गुलीगत पॅटर्न लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सूरजला सुरुवातीपासूनच ट्रॉफी आपण जिंकणार हा आत्मविश्वास होता.

'बिग बॉस मराठी 5' च्या विजयानंतर सूरजने (Suraj Chavan) मीडियाशी बोलताना म्हणाला की, "मी माझ्या चाहत्यांचे आणि बिग बॉस मराठीचं खूप आभार मानतो. मला अभिमान आहे की मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकलो आहे. मी आधीच म्हणालो होतो की मीच ट्रॉफी जिंकणार आहे, मी 'झापुक झुपूक' पॅटर्नमध्ये ट्रॉफी घेऊन घरी जाणार आहे. आज हे खरं झालं. आपला पॅटर्न लय हटके गुलीगत पॅटर्न…बुक्कीत टेंगूळ!" मिळालेल्या रक्कमेचं सूरज घर बांधणार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्या घराला तो 'बिग बॉस' नाव देणार आहे.

अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी टॉप-3 मध्ये आले. सूरजला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी आणि घरातील सदस्यांनी खूप साथ दिली. सूरजला ट्रॉफीसोबतच 14.6 लाखांचा पारितोषिक मिळालं आहे.सूरजनं खूप कठीण परिस्थितीचा सामना केला आहे. त्याच्या आई-बाबांचं लहानपणीच निधन झाले आहे. त्याचा संपूर्ण सांभाळ त्याच्या मोठ्या बहिणेने केला आहे. बिग बॉसच्या घरात सूरजने कमाल खेळ खेळला आहे. आपल्या बोलण्याने आणि वागण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पॅडी दादासारखा मित्र त्यांने कमावला आहे. तो आपल्या शैलीमुळे बिग बॉस घरात कायम चर्चेत राहीला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

Vidyadhar Joshi: 'सोनं खरेदी करणं म्हणजेच विनोद'; मोदींच्या आवाहनावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट

SCROLL FOR NEXT