Bigg Boss Marathi 5 New Promo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 Promo : 'बिग बॉसच्या किचनमध्ये भांड्याला भांडं लागणार...', रितेश देशमुखच्या स्टाईलने 'बिग बॉस मराठी ५'वा सीझन गाजणार

Bigg Boss Marathi 5 : रितेश 'बिग बॉस'ची शोभा वाढवणार असल्याचं स्पष्ट झालाय. त्याता आता पुन्हा नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे...

Apurva Kulkarni

मनोरंजनाचा बादशाह असलेल्या 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची घोषणा करण्यात आलीय. यावेळी महेश मांजरेकर ऐवजी रितेश देशमुख बिग बॉस घरात सर्वांवर नजर ठेवणार आहे. काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या प्रोमोवरुन रितेश 'बिग बॉस'ची शोभा वाढवणार असल्याचं स्पष्ट झालाय. त्याता आता पुन्हा नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे...

बिग बॉस मराठीच्या पहिल्या प्रोमोमध्ये रितेशची लयभारी स्टाईल पहायाला मिळाली होती. आता या नव्या प्रोमोमध्ये रितेशची डायलॉगबाजी पहायला मिळाली आहे. 'तंटा नाय तर घंटा नाय' असं म्हणत मी रितेशनं आपला वेगळा अंदाज प्रेक्षकांना दाखवून दिलाय.. तसंच 'ते प्लॅन बनवणार आणि मी तोडणार.. कारण आता मी आलोय तर कल्ला होणार... तो पण माझ्या स्टाईलने".असा वेगळा स्वॅग रितेशनं नव्या प्रोमो मधून दाखवून दिलाय. त्यामुळे बिग बॉसच्या घरात अफलातून धमाल आणि कल्ला तर होणारच यात काही शंका नाही.

'बिग बॉस' मराठीचा नवा सीझन प्रेक्षकांना कलर्स मराठी आणि जिओ सिनेमावर पाहता येणार आहे. रितेश देशमुख आपल्या आगळावेगळ्या भन्नाट स्टाईलनं प्रेक्षकांच मनोरंजन करणार आहे. परंतु या सिजनमध्ये स्पर्धक कोण असतील, कोणाला संधी मिळेल, कोणाची खेळी प्रेक्षकाला भावेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. वेगवेगळ्या आव्हानाना तोंड देत, बिग बॉसच्या घरातील कल्ला लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करेल यात काही शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT