Bigg Boss Marathi canva
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा एकदा राडा; सूरजमुळे निक्की आणि अंकिता भिडले..

Bigg Boss Marathi New Promo: बिग बॉस मराठीतच्या पुन्हा एकदा राडे पाहायला मिळणार आहे. सूरजला बोलल्यामुळे निक्की आणि अंकितामध्ये कडाक्याच भांडण होणार आहे.

Saam Tv

बिग बॉस मराठीचा ५वा सिझन त्याच्या अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा फिनाले आयोजित करण्यात आला आहे. मागील आठवड्यामध्ये स्पर्धकांच्या घरातील सदस्य त्यांना भेटायला बिग बॉसच्या घरामध्ये आले होते. त्यावेळी घरातील सर्व सदस्य भावूक झालेले पाहायला मिळाले. येणारा आठवडा बिग बॉस मराठी सिझन ५चा शेवटचा आठवडा असणार आहे. यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये नवीन ट्विस्ट आणि मनोरंजन पाहायला मिळणार आहे. शनिवारच्या भागामध्ये बिग बॉसच्या घरातील जुण्या सदस्यांची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळाली.

विकेंडला बिग बॉस मराठीतच्या घारामध्ये अभिजीत बिचुकले, अनिल थत्ते आणि राखी सावंत यांची ग्रँड एन्ट्री पाहायला मिळाली होत. त्यादरम्यान प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन देखील झाले. आता कलर्स मराठीकडून एक नवा प्रोमो प्रदर्शित करण्यत आला आहे. या व्हिडिओमध्ये निक्की तांबोळी आणि अंकिता वालावलकर यांच्यामधील वाद पुन्हा एकदा पेटलेला दिसतोय.

निक्की आणि अंकिता यांच्यामधील वाद सूरजला बोलल्यामुळे झाला आहे. व्हिडिओमध्ये अंकिता सूरजला विचारते की तू खुर्चीवर सुद्धा सांडवलं आहेस का? त्यावर निक्की अंकिताला म्हणते की "जाऊदे ना त्याला परत टोकणार आहेस का?". त्यावर अंकिता सुरजला चिडून म्हणते की, "ती संगेल ते ऐक." त्यावर पुन्हा एकदा निक्की बोलते की, "प्रत्येक गोष्टीमध्ये सूरजला टोमणा मारायचा आणि टोकायचं, तुम्ही त्याला घर देताय म्हणून त्याच्यावर अत्याचार करू नका." त्यानंतर बाथरुममध्ये जाऊन अभिजीत पॅडी दादांना म्हणतो की, "सारखं सारखं त्याला टोकणं चांगलं नाही. त्याला ते आवडत नाही." यावर पॅडी दादा त्याला म्हणतात की निक्कीच्या मतांशी तू सहमत आहेस तर.

त्यानंतर निक्की सगळ्यांसमोर म्हणते की, तुमचं खरं रुप बाहेर आलं की तुम्हाला टोचतं. सूरजला बोलल्यामुळे झालेला हा वाद नेमका किती पेटणार हे पाहाणं रंजक ठरेल. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या ८ सदस्य नॉमिनेटेड आहेत. त्यामुळे कोणते सदस्य यंदाच्या आठवड्यात घराबाहेर जाणार हे सांगणं कठीण झाले आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT