Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

Nikki Tamboli And Arbaz Patel : 'बिग बॉस मराठी' च्या घरात नवीन कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे. यात अरबाज आणि निक्की पुन्हा समोरासमोर येणार आहेत. त्यामुळे घरात नवीन कोणता राडा होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) घरात सतत वाद, भांडणे आणि राडा होत असतात. प्रत्येक दिवशी खेळाला नवीन रंग चढू लागला आहे. आता नवीन कॅप्टन्सी टास्क बिग बॉस घरात पार पडणार आहे. कोण होणार नवा कॅप्टन याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. या कॅप्टन्सी टास्कमध्ये कोणाचं गोड पाणी तर कोणाची तहान भागवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या घरात कॅप्टन्सी पदासाठी पुन्हा राडा पाहायला मिळणार आहे. नवा कॅप्टन्सी टास्कमध्ये सर्व प्राण्यांची तहान भागवावी लागणार आहे. नुकताच 'बिग बॉस मराठी' चा नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यात वर्षा ताई बोलते की, "आपली तहान भागवा". अरबाज (Arbaz Patel) म्हणतोय,"हे खूप गोड पाणी आहे" यावर निक्की (Nikki Tamboli) म्हणते की, "कालपासून तू इतका कडवा होतास...अचानक तुझं पाणी गोड कसं झालं?"

दुसरीकडे वर्षा ताई आणि पॅडी दादा मध्ये वाद होताना दिसतो. पॅडी दादा वर्षा ताईंना म्हणतो की, "आम्ही पाणी पिऊ यावर तुमचा विश्वास होता का?" त्यावर वर्षा ताई हो! असे उत्तर देतात. पुढे पॅडी दादा वर्षा ताईंना स्पष्ट म्हणतात की, "स्टॅटर्जी करताना तुम्ही त्यांच्यासोबत बसणार आणि आमच्यावर विश्वास ठेवणार" असे बोलून पॅडी दादा आपली नाराजी व्यक्त करतो.

येत्या आठवड्यात कोण कॅप्टन होणार हे जाणून घेण्यास प्रेक्षक आतुर आहेत. 'बिग बॉस मराठी 5 ' ला मोठ्या प्रमाणात प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे. अरबाज आणि निक्कीची मैत्री कोणतं रूप घेणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच निक्की आणि अरबाज हे दोघे स्वतंत्र गेम खेळणार की पुन्हा एकत्र येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

४०-५० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस थेट २०० फूट खोल दरीत कोसळली, विद्यार्थी बसमध्ये अडकले, VIDEO

Maharashtra Live News Update : पुण्यात इमारतीच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग

Chanakya Niti: या ५ ठिकाणी माणसाने कधीच पाऊल ठेवू नये, नाहीतर इज्जतीला लागेल कलंक

Horrific Accident : भीषण अपघातात भाजप नेत्यासह दोघांचा मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

धक्कादायक! रेड लाइट एरियात १२ वर्षीय मुलीला विकण्याचा प्रयत्न, आरोपीला स्थानिकांनी पकडून चोपलं

SCROLL FOR NEXT