Bigg Boss Marathi Winner  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5: राडा, भांडण अन् प्रेम, शेवटच्या टप्प्यावर आता नेमकं काय घडणार? बिग बॉसचा विजेता कोण होणार? सोशल मीडियावर चर्चा

Bigg Boss Marathi 5 Winner: बिग बॉस मराठी सीझन 5 आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे.येत्या 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठी सीझन 5 चा ग्रँड फिनाले आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन 5 आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. बिग बॉस मराठीचा विजेता ठरण्यासाठी आता काही दिवसच बाकी आहेत. येत्या 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठी सीझन 5 चा ग्रँड फिनाले आहे. अशातच बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यापासून 16 स्पर्धकांपैकी आता 7 स्पर्धक आहेत. या 7 स्पर्धकांमध्ये बिग बॉस मराठी सीझन 5 ची ट्रॉफी कोण जिंकणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

कोण होणार बिग बॉस मराठी सीझन 5 चा होणार?

'बिग बॉस मराठी 5'चा होस्ट रितेश देशमुख यांनी केले असून बिग बॉसच्या घरात प्रत्येक स्पर्धकांच्या खेळीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आता या सीझनचा ग्रँड फिनाले अगदी जवळ आला आहे. आता विजेत्याचे नाव जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये टॉप 7 स्पर्धक उरले आहेत. यात अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, वर्षा उसगावकर, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी हे आहेत आहे. यामध्ये ट्रॉफी कोण जिंकेल याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. आता बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता कोण होणार अशी चर्चा आहे.

बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी या नावाची चर्चा

सोशल मीडियावर अभिजीत सांवत आणि सूरज चव्हाण या दोन स्पर्धकांच्या नावाची चर्चा आहे. अभिजीत इंडियन आयडॉल विनर असल्याने तो आधीच लोकप्रिय आहे. तर सूरज चव्हाण पहिल्याच आठवड्यापासून प्रेक्षकांची मने जिंकत आला आहे. बिग बॉसच्या घरात सूरजची कॉमेडी, दमदार खेळी, डायलॉगबाजी दिसली. सूरज चव्हाण हा त्यांच्या स्टाईलने प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

निक्की जिंकणार! प्रेक्षकांचा वोट कुणाला?

बिग बॉसच्या घरातून निक्कीने फिनालेमध्ये तिची जागा मिळवली आहे. मात्र,आता उर्वरित सदस्यांपैकी बिग बॉस मराठीच्या रेस टू फिनालेमध्ये कोण कोण जाणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलंच आहे. अशातच बिग बॉसची स्टार क्वीन निक्कीला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळताना दिसतो आहे. निक्की पहिल्याच आठवड्यापासून तिच्या दंबंग स्टाईलमध्ये दिसत आहे. कधी प्रेम तर कधी राडा करणारी निक्कीची क्रेझ शेवटच्या आठवड्यातही अधिकच वाढताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT