Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: आजपासून १३ व्या दिवशी बिग बॉसचा Grand Finale, कोण मारणार बाजी?

Bigg Boss Marathi Grand Finale : बिग बॉसचा मराठीचा सर्वात गाजलेला सीझन 5 लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. बिग बॉस मराठी 5 ची ग्रँड फिनाले तारीख समोर आली आहे.

Shreya Maskar

BB Marathi Entertainment News Updates in Marathi: बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) गेम काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यंदाचा सीझन सर्वत्र खूप गाजला आहे. बिग बॉसने अधिकृत घोषणा करून 100 दिवसांचा खेळ 70 दिवसांत संपणार असल्याचे सांगितले आहे. या आधी झालेले सर्व सीझन 100 दिवसांचे होते. मात्र हाच एक सीझन फक्त 70 दिवसांचा होणार आहे.

बिग बॉस मराठीचा 5 वा सीझन फक्त 10 आठवड्यांचा असणार आहे. त्यामुळे येत्या 13 दिवसांत बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. ज्याची सर्व महाराष्ट्र खूप वाट पाहत आहे. येत्या 6 ऑक्टोबर 2024 रोजी बिग बॉस मराठी सीझन 5 चा ग्रँड फिनाले ( Grand Finale ) धुमधड्याक्यात होणार आहे.

बिग बॉस मराठीत या आठवड्यात घरातील सर्व सदस्यांना नॉमिनेट करण्यात आले आहे. कारण आता बिग बॉसचा खेळ अवघ्या दोन आठवड्याचा उरला आहे. या आठवड्यात घरातील सर्व सदस्यांनी निक्कीला टार्गेट केलं आहे. अरबादज गेल्यापासून निक्की एकटी पडली असल्याचे दिसून येत आहे. आता बिग बॉसच्या घरात पॅडी दादा, वर्षा ताई, डिपी दादा, अंकिता, निक्की, अभिजीत, सूरज आणि जान्हवी हे सदस्य आहेत. 'बिग बॉस मराठी 5' हा शो 16 सदस्यांनी सुरू झाला होता. यानंतर संग्राम चौगुलेची घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री करण्यात आली. आता फक्त बिग बॉस घरात 8 सदस्य उरले आहेत. यांपैकी कोणाला फायनलचं तिकीट मिळवणार आणि कोण घराबाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT