Abhijeet Sawant SAAM TV
मनोरंजन बातम्या

Abhijeet Sawant : अभिजीत सावंतच्या बोटाला का लावलेत स्क्रू, काय आहे बंदुकीची कहाणी?

Abhijeet Sawant Finger Injury Update : बिग बॉसच्या घरात अभिजीत सावंतला दुखापत झाली होती. त्याचा हेल्थ अपडेट नुकताच अभिजीतने दिला आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi 5) उपविजेता अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. बिग बॉसमुळे अभिजीतला लोकांकडून चांगले प्रेम मिळाले. बिग बॉसच्या शेवटच्या दिवसात त्याच्या हाताला बँडेज लावलेले पाहायला मिळाले होते. तेव्हा पासून नेमकं अभिजीतच्या बोटाला झाले काय? त्याने बँडेज का लावले आहे? असे अनेक प्रश्न चाहत्यांना होते. खरतरं बिग बॉसमध्ये एका टास्क दरम्यान अभिजीतच्या बोटाला दुखापत झाली होती. आता बिग बॉसच्या बाहेर आल्यानंतर खूप दिवसांनी त्यांनी आपला हेल्थ अपडेट चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

नुकताच अभिजीत सावंतने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत हॉस्पिटलमध्ये गेलेला पाहायला मिळत आहे. या व्हिडीओ त्यांनी एक खास कॅप्शन दिले आहे. त्यांनी लिहिलं की, "बिग बॉसच्या घरात असल्यापासून संभाळून ठेवलेली ही बंदूक Finally माझ्या हातातून काढून टाकलेली आहे!" अभिजीतला बिग बॉसच्या घरात गेम खेळताना बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे बिग बॉसच्या घरात शेवटच्या काळात त्याच्या बोटाला प्लास्टर लावलं होते. आता फायनली बिग बॉसनंतर अभिजीतच्या हातातील प्लास्टर काढल आहे.

'बिग बॉस मराठी 5' चा उपविजेता अभिजीत सावंत ठरला. त्यांनी संपूर्ण बिग बॉसच्या प्रवासात छान गेम खेळला आहे. बिग बॉसच्या घरात त्याची आणि निक्कीची छान मैत्री झाली. यंदाचा बिग बॉसचा सीझन ७० दिवसांमध्ये संपला.'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हाण झाला आहे. सर्वत्र सूरजचे कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT